Government Schemes : राज्यातील 12 वी पास मुलींना न्यूयॉर्कमध्ये (New York)पदवी शिक्षणासाठी स्कॉलरशिप (scholarship)दिली जाणार आहे. न्यूयॉर्कमधील बीएमसीसी, अर्थात बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज (Borough of Manhattan Community College)या महाविद्यालयानं महाराष्ट्रामधील दहा विद्यार्थिनींना बारावीनंतरच्या पदवी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्यायचं जाहीर केलं आहे. त्यामुळे दहा विद्यार्थिनींना उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी (Higher and Vocational Education)या महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे.
Maratha Reservation: जरांगेंची मुंबईकडे कूच; सरकारचा मराठा समाजाच्या सर्वेक्षणाबाबत मोठा निर्णय
राज्यातील महिलांचे सबलीकरण व्हावे, शिक्षणापासून त्या वंचित राहू नये, यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर या शिष्यवृ्त्तीचे आयोजन केले आहे. आर्थिक परिस्थितीमुळे मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी गुणवंत विद्यार्थिनींना न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीद्वारे शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
रश्मिकाचा डीपफेक व्हिडिओ कसा बनवला गेला? आरोपींचे मोठे खुलासे
या शिष्यवृ्त्तीबद्दल शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबद्दल माहिती दिली आहे. यामध्ये जर्मनीमधील महाविद्यालयांमध्येही शिक्षण घेण्याची संधी दिली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करायचा?
न्यूयॉर्क शिष्यवृत्ती योजना ही ऑगस्ट 2024 पासून सुरू होणार आहे, न्यूयॉर्कमधील ‘बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज’ सोबत महाराष्ट्र शिक्षण विभागाद्वारे करण्यात आलेल्या करारानुसार राज्यातील विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती ऑगस्ट 2024 पासून दिली जाणार आहे.
न्यूयॉर्क शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थिनींनी मुंबईमधील जुहूमधील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (SNDT) येथे संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
विद्यापीठाची अधिकृत वेबसाईट आहे, अधिक माहितीसाठी विद्यार्थिनींनी www.bmcc.cuny.edu/apply या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संकेतस्थळावर या शिष्यवृत्ती योजनेसंबंधित सर्व माहिती दिली आहे. माहिती काळजीपूर्वक वाचून दिलेल्या सूचनांचे पालन करुन त्या प्रकारे शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
लाभ कसा मिळणार?
न्यूयॉर्क शिष्यवृत्तीद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींचा पहिल्या वर्षाचा ट्युशन खर्च न्यूयॉर्कमधील ‘बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज’ उचलणार आहे.
त्यामुळे विद्यार्थिनींना कोणताही आर्थिक खर्च करण्याची गरज राहणार नाही, शून्य रुपयात अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरातील नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार आहे.
न्यूयॉर्क शिष्यवृत्तीचा लाभ फक्त 10 विद्यार्थिनींना देण्यात येणार आहे, दहा विद्यार्थिनींची निवड ही विविध निकषांच्या आधारे केली जाणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना शिष्यवृत्तीप्राप्त दहा विद्यार्थिनींना राहण्याच्या तसेच इतर खर्चात देखील सवलत दिली जाणार आहे.