एक चूक व्हिडिओ व्हायरल अन् थेट राजीनामा…नेमकं काय घडलं?

Astronomer Company CEO Resigned After Video Viral : न्यू यॉर्कमधील (New York) एआय कंपनी अॅस्ट्रोनॉमरचे सीईओ अँडी बायर्न यांनी एका व्हायरल व्हिडिओनंतर आपल्या पदाचा राजीनामा (Astronomer Company) दिलाय. व्हिडिओमध्ये बायर्न आणि कंपनीचे चीफ पीपल ऑफिसर क्रिस्टिन कॅबोट बोस्टनजवळील कोल्डप्ले कॉन्सर्ट दरम्यान ‘किस कॅम’वर दिसले. या घटनेची सोशल मीडियावर खूप (Viral Video) चर्चा झाली. वाद वाढला आणि आता त्यांनी आपले पद सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळतेय.
व्हिडिओमध्ये बायर्न आणि कॅबोट एकमेकांच्या जवळ दिसले. ज्यामुळे या दोघांचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या अफवा पसरल्या. कोल्डप्लेचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन यांनी त्या क्षणावर भाष्य केलंय. त्यांनी म्हटलंय की, त्यांचे एकतर प्रेमसंबंध आहेत किंवा ते खूप लाजाळू आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला, ज्यामुळे कंपनीवर दबाव वाढला.
एकाच कुटुंबातील तिघा चिमुकल्यांना अचानक लुळेपणा! गावात खळबळ, आरोग्य यंत्रणा हादरली
राजीनाम्याची पुष्टी करणारं निवेदन
शनिवारी स्ट्रोनॉमरने बायर्नच्या राजीनाम्याची पुष्टी करणारं एक निवेदन जारी केलंय. अँडी बायर्न यांनी त्यांचा राजीनामा सादर केलाय. संचालक मंडळाने तो स्वीकारला आहे. यापूर्वी कंपनीने बायर्न यांना रजेवर पाठवले होते. अंतरिम सीईओची नियुक्ती केली होती. अॅस्ट्रोनॉमरने असंही स्पष्ट केलंय की, व्हिडिओमध्ये दिसणारी महिला कंपनीच्या एचआर विभागाच्या उपाध्यक्षा एलिसा स्टॉडार्ड नव्हती. परंतु ती एचआर असल्याच्या दावा करण्यात आला होता.
अँडी बायर्न आणि क्रिस्टिन कॅबोट
तेव्हा मी कुणाला तरी… सभागृहातील रमीच्या व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, अजित पवार समज देणार?
अँडी बायर्न जुलै 2023 पासून अॅस्ट्रोनॉमरचे सीईओ आहेत. कंपनी त्यांच्या प्रमुख प्लॅटफॉर्म अॅस्ट्रोसाठी ओळखली जाते. ती अपाचे एअरफ्लो वापरून डेटा वर्कफ्लो व्यवस्थापित करते. क्रिस्टिन कॅबोट नोव्हेंबर 2024 मध्ये कंपनीत चीफ पीपल ऑफिसर म्हणून सामील झाल्या. दोघांनीही व्हायरल व्हिडिओवर सार्वजनिकपणे भाष्य केलेले नाही.
कंपनीची किंमत 11 लाख कोटी
ज्या खगोलशास्त्रज्ञ कंपनीचे सीईओ अँडी बायरन होते, ती कंपनी 11 लाख कोटी रुपयांची आहे. ही कंपनी इतर कंपन्यांना त्यांचा डेटा व्यवस्थापित करण्यास मदत करते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अँडी बायरनची पत्नी मेगन केरिगन बायरनने तिच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून बायरन हे आडनाव काढून टाकले. तिने तिचे फेसबुक अकाउंट देखील डिलीट केले. ज्यामध्ये पूर्वी अनेक कुटुंबाचे फोटो होते.
जगप्रसिद्ध कोल्डप्ले कॉन्सर्टदरम्यान ‘किस कॅम’वर आलेल्या एका व्हिडिओने अमेरिकेतील नामांकित एआय कंपनी अॅस्ट्रोनॉमर (Astronomer) मध्ये खळबळ उडवली आहे. या व्हिडिओमध्ये कंपनीचे माजी CEO अँडी बायरन (Andy Byron) आणि त्यांच्या सोबत HR प्रमुख क्रिस्टिन कॅबोट (Kristin Cabot) हे एकमेकांच्या शारीरिक जवळिकीच्या अवस्थेत दिसले. हे दृश्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर, वाढलेल्या सार्वजनिक दबावामुळे बायरन यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला.
बीबीसीच्या अहवालानुसार, या प्रकारामुळे कंपनीच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला. त्यामुळे झालेल्या अंतर्गत चर्चांनंतर अँडी बायरन यांना जबाबदारी स्वीकारत CEO पदावरून पायउतार व्हावं लागलं. कंपनीच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, अँडी बायरन यांनी राजीनामा दिला असून संचालक मंडळाने तो स्वीकारला आहे. कंपनी आता नव्या CEO च्या शोधात आहे. राजीनाम्यानंतर, अॅस्ट्रोनॉमरचे सह-संस्थापक आणि मुख्य उत्पादन अधिकारी पीट डीजॉय (Pete DeJoy) यांची कार्यवाहक CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहेत पीट डीजॉय?
पीट डीजॉय हे सध्या ब्रुकलिन, न्यू यॉर्कमध्ये वास्तव्यास आहेत. ते गेल्या 8 वर्षांहून अधिक काळ अॅस्ट्रोनॉमरमध्ये कार्यरत असून, त्यांनी ऑगस्ट 2017 पासून संस्थापक टीमचा भाग म्हणून काम केले आहे. फेब्रुवारी 2025 पासून ते पूर्णवेळ मुख्य उत्पादन अधिकारी (Chief Product Officer) म्हणून कार्यरत आहेत. याआधी त्यांनी ग्लोबल प्रॉडक्टचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून काम केलं होतं. डेजॉय यांचे शिक्षण बोडॉइन कॉलेज (Bowdoin College) मधून असून, त्यांनी रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रात बॅचलर पदवी मिळवली आहे.