मोहन भागवतांच्या न्यूयॉर्कमध्ये कार्यक्रम; ममदानींच्या विरोधामुळे महाराष्ट्रात राजकीय वाद

Mohann Bhagwat’s New York event मोहन भागवत यांच्या न्यूयॉर्कमधील कार्यक्रमाला महापौर जोहरान ममदानी यांच्या विरोधामुळे महाराष्ट्रात राजकीय वाद

Mohann Bhagwat’s New York event

Mohan Bhagwat’s New York event: अमेरिकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या कार्यक्रमाला परवानगी मिळाली असली, तरी कार्यक्रमापूर्वीच त्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये शनिवारी (29 ऑगस्ट) आयोजित करण्यात आलेल्या ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ कार्यक्रमाला न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणातही या कार्यक्रमावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

21 वा ‘आशा भोसले पुरस्कार’ श्रेया घोषाल यांना जाहीर; शनिवारी सुनेत्रा पवारांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

मोहन भागवत सध्या अमेरिकेत असून, ‘अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग फोरम’ (AHEAD) या संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे हा कार्यक्रम होणार आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’चा संदेश देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

न्यूयॉर्कच्या महापौरांचा कार्यक्रमाला विरोध

कार्यक्रमाला परवानगी मिळाल्यानंतरही न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी या कार्यक्रमाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या भूमिकेमुळे कार्यक्रमाच्या आयोजनावरून नवा राजकीय वाद सुरू झाला आहे.

कंत्राटदार गजानन देवकातेंच्या आत्महत्येला आमदार, अधिकाऱ्यांची टक्केवारी जबाबदार?

ममदानी यांच्या विरोधाची चर्चा महाराष्ट्रातही रंगली असून, काँग्रेस आणि भाजप नेत्यांकडून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत.

नाना पटोलेंचा सवाल

काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला अमेरिकेत परवानगी कशी मिळाली, यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ममदानी यांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी संघाच्या कार्यक्रमाबाबत शंका व्यक्त केली आहे.

राम कदमांचा पलटवार

भाजपचे आमदार राम कदम यांनी मात्र नाना पटोले यांच्या भूमिकेवर टीका केली. मोहन भागवत कार्यक्रमात नेमके काय बोलणार आहेत, हे ऐकण्याआधीच न्यूयॉर्कच्या महापौरांनी विरोध का केला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

अभिषेक बच्चन याने ETPL सुरुवातीचा केला श्री गणेशा ! “HERE WE GO! EUROPEAN T20 LEAGUE.”

भागवत काय संदेश देणार?

‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘वसुधैव कुटुंबकम’चा संदेश देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. मात्र, कार्यक्रमापूर्वीच महापौरांच्या विरोधामुळे त्याला राजकीय रंग चढला आहे. त्यामुळे शनिवारी न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात मोहन भागवत नेमकी कोणती भूमिका मांडतात आणि कोणता संदेश देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us