एकाच कुटुंबातील तिघा चिमुकल्यांना अचानक लुळेपणा! गावात खळबळ, आरोग्य यंत्रणा हादरली

Chhatrapati Sambhajinagar Shocking News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhajinagar) खंबाटवस्ती (पाथ्री, फुलंब्री) येथे एकाच नातेसंबंधातील तीन बालकांना एकाच प्रकारची लक्षणं आढळले. त्यामुळं संपूर्ण परिसरात चिंतेचं वातावरण आहे. ही मुलं वयानुसार एकमेकांपासून वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत. तिघांनाही लुळेपणा, अंगात कमकुवतपणा आणि चालण्यात अडचण जाणवत (Shocking News) आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागाने ‘एएफपी’ (Acute Flaccid Paralysis) म्हणून ही नोंद केल्यामुळे पोलिओ किंवा गुलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) यासारख्या आजारांची शक्यता गृहीत धरली जात आहे. तातडीने तपासण्या आणि सॅम्पल पाठवण्याचे काम हाती घेण्यात (Paralysis And Weakness) आले आहे.
भाषा लढण्याचं कारण नाही! भाजपच्या धोरणांवर रविश कुमारांचा थेट प्रहार
उपचार सुरू
सुरुवातीला 12 जुलै रोजी 9 वर्षीय मुलाला लक्षणं जाणवू लागली. गावातच प्राथमिक उपचार करण्यात आले. परंतु प्रकृती सुधारत नसल्याने त्याला शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर 16 जुलै रोजी 11 वर्षीय मुलाला आणि 17 जुलै रोजी 30 महिन्यांच्या बाळालाही अशीच लक्षणं दिसून आल्यानं त्यांनाही तातडीने उपचारासाठी नेण्यात आलं. त्यातील दोन मुलांवर पीआयसीयूमध्ये तर 30 महिन्यांच्या मुलावर जनरल वॉर्डात उपचार सुरू आहेत. वडोदबाजार आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या खंबाटवस्तीमध्ये सर्वेक्षण सुरू करण्यात आलं. सध्या तरी या तिन्ही बालकांशिवाय इतर कोणत्याही मुलामध्ये अशी लक्षणं आढळून आलेली नाहीत.
गावात भीतीचे सावट
या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. पालक आपल्या मुलांच्या तब्येतीबाबत चिंताग्रस्त आहेत. ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेत डॉक्टर, परिचारिका आणि आशा वर्कर यांची विशेष टीम गावात तैनात करण्यात आली आहे. सध्या गावातील जवळपास 100 कुटुंबांवर सर्वेक्षण सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार पिण्याच्या पाण्यामध्ये काही प्रकारचा विषाणूजन्य दूषितपणा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गावातील सार्वजनिक नळांमधून पाणी पिण्यावर बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांना उकळलेलं आणि फिल्टर केलेलं पाणी वापरण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय या मुलांचे पोषण आणि इम्युनायझेशन स्टेटस तपासले जात आहे.
राज्यस्तरीय पथकाची शक्यता
जर या घटनेतील मुलांमध्ये पोलिओचे लक्षणं स्पष्टपणे आढळली, तर राज्य आरोग्य विभागाकडून विशेष वैद्यकीय पथक पाठवले जाऊ शकते. केंद्र शासनाच्या पातळीवरूनही याबाबत लक्ष दिलं जाईल, असा अंदाज आहे. ही घटना समोर आल्यानंतर जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि स्थानिक यंत्रणा अधिक चौकशी करत आहेत. पुढील अहवाल येईपर्यंत खबरदारी आणि उपचार सुरू आहेत.