राज्यातील नगरपालिका,नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला…2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल..

मोठी बातमी समोर येत आहे, आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महत्वाची घोषणा केली आहे. राज्यातील निवडणुका जाहीर केल्या आहेत.

  • Written By: Published:
News Photo   2025 11 04T161122.280

आज निवडणूक आयोगाने (Commission) पत्रकार परिषद घेत महत्वाची घोषणा केली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचं वेळापत्रक जाहीर केलं असून  नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याचं जाहीर केलं आहे. यामध्ये निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगरपरिषदा आणि एकूण 42 नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. यामध्ये 2 डिसेंबरला मतदान होणार आणि 3 डिसेंबरला निकाल येणार असल्याची माहिती आयोगाच्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

मतदारांना मोबाईल अॅपद्वारे मतदान केंद्र, यादीतील नाव, उमेदवाराची माहिती मिळेल. तसंच, संभाव्य दुबार नावांबाबत दक्षता घेण्यात आलीय, टुलद्वारे याचा शोध घेऊन संभाव्य दुबार मतदारांच्या नावापुढं डबल स्टार करण्यात आलं आहे. अश्या डबल स्टार मतदारांकडून स्पष्टीकरण घेतलं जाईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेआधी महाविकास आघाडी मनसे आयोगाच्या दरबारात, काय घडलं?

मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये मोबाईल नेता येणार आहे. मात्र, प्रत्यक्ष मतदान केंद्रात मोबाईल नेता येणार नाही. 288 निवडणूक अधिकारी असतील. तर, तेवढेच निवडणूक निर्णय अधिकारी असतील. 53 लाख पुरूष मतदार आहेत. तेवढेच महिला मतदार आहे. 1 कोटी 07 लाख एकूण मतदार मतदान करतील.

मतदारांसाठी जे संकेतस्थळ दिलं आहे, त्यात सर्च फॅसिलिटी असून तिथे मतदारांना नाव आणि केंद्र शोधता येणार आहे. त्याचबरोबर मोबाईल अॅपद्वारे नाव आणि केंद्र शोधण्याची व्यवस्था असून यात उमेदवाराविषयी माहितीही उपलब्ध असणार आहे असंही आयोगाने स्पष्ट केलं आहे.

अर्ज करण्याची तारीख

10 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करता येणार आहे. 17 नोव्हेंबरपर्यंत हे अर्ज करता येणार आहेत. अर्ज माघारीसाठी 21 नोव्हेंबर पर्यंतची मुदत आहे. 2 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि 3 डिसेंबरला निकाल जाहिर होणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.

निवडणुकीत खर्चाची मर्याद वाढवण्याचा निर्णय
खर्च मर्यादा

अ वर्ग, नगर परिषद, अध्यक्ष पदासाठी- १५ लाख

सदस्य-५ लाख

ब वर्ग नगर परिषद अध्यक्ष- ११ लाख २५ हजार

ब वर्ग नगर परिषद सदस्य -३ लाख ५० हजार

क वर्ग नगर परिषद अध्यक्ष- ७ लाख ५० हजार

क वर्ग नगर परिषद सदस्य -२ लाख ५० हजार

नगर पंचायत अध्यक्ष- ६ लाख

नगर पंचायत सदस्य -२ लाख २५ हजार

 

Tags

follow us