Election Commission चा मोठा निर्णय; पराभूत उमेदवारांना मिळणार ‘हा’ अधिकार

Election Commission चा मोठा निर्णय; पराभूत उमेदवारांना मिळणार ‘हा’ अधिकार

Election Commission Gives chance to losing candidate Check EVM : एकीकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल काही तासांवर येऊन ठेपले असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने ( Election Commission ) पराभूत उमेदवारांसाठी ( losing candidate ) एक योजना आणली आहे. यानुसार आता पराभूत उमेदवार ईव्हीएम मशीनमधील मायक्रो चीप तपासू शकणार आहेत.

छगन भुजबळ कोणत्या गटात? जयंत पाटील म्हणाले, ‘उद्या संध्याकाळी…’

दरम्यान पराभूत झाल्यानंतर त्या पराभूत उमेदवारांकडून नेहमीच ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला जातो. त्यामुळेच केंद्रीय निवडणूक आयोगाने पराभूत उमेदवारांना ईव्हीएम मशीन तपासण्याची सोय केली आहे. त्यासाठी संबंधित उमेदवाराला मतमोजणीनंतर सात दिवसाच्या आत इव्हीएम तपासणीसाठी अर्ज करता येणार आहे. मात्र यासाठी उमेदवाराला चाळीस हजार रुपये भरावे लागणार आहेत.

नितीशकुमारांचं पुन्हा वेगळं पॉलिटिक्स, केंद्रात येण्यासाठी भेटीगाठी; बिहारचं राजकारण पुन्हा बदलणार?

निवडणूक आयोगाकडून नुकत्याच या संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दुसऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवाराला निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर सात दिवसाच्या आत निवडणूक आयोगाकडे अर्ज सादर करावा लागेल. तसेच पराभूत उमेदवाराला देशामध्ये अशा प्रकारचा अधिकार पहिल्यांदाच मिळाला आहे.

दुसरीकडे देशासह राज्यात लोकसभेची निवडणुक ( Lok Sabha Election ) पार पडली. त्यानंतर आथता सर्वांचं लक्ष लागलं आहे. ते उद्या 4 जूनला लागणाऱ्या निवडणुकीच्या निकालाकडे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रशासनाकडून मतमोजणीची अंतिम तयार झाली आहे. अवघ्या काही तासांवर आलेल्या या मतमोजणीसाठी राज्यातील जिल्ह्यांसाठी मतमोजणीचा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube