Download App

Government Schemes : शेतकरी मित्रांना मिळणार विहीर, ठिबक, पाईप अन् पंपासाठी अनुदान…

अनुसूचित जातीच्या शेतकरी बांधवांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून विविध लाभ घेता येतात. अनुसूचित जमातीचे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी अर्ज करून लाभ घेऊ शकतात

Government Schemes: शेतकरी मित्रांनो, अनुसूचित जातीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन (Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swalamban Yojana)तर अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना, (Farmer)शेतीचा दर्जा सुधारण्यासाठी अडीच लाखांपर्यंत अनुदान दिले जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटीवर (Mahadbt)अर्ज करावा लागतो. केंद्र आणि राज्य सरकारकडून (State Govt)विविध समाजाच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. सा योजनेसाठी आधी ऑफलाइन अर्जाची मागणी केली जात असे. मात्र, अलिकडच्या काळात ऑनलाईन अर्ज सादर केले जात आहेत.

IFFM 2024: विक्रांत मॅसीच्या ’12वी फेल’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार, कार्तिकही ‘चॅम्पियन’ ठरला

अनुसूचित जातीच्या शेतकरी बांधवांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून विविध लाभ घेता येतात. अनुसूचित जमातीचे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी अर्ज करून लाभ घेऊ शकतात.

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या कॅप्टनसी टास्कमध्ये निक्की अन् योगिता भिडल्या; कोण होणार कॅप्टन

योजनेद्वारे कोणत्या घटकासाठी किती अनुदान?
– नवीन विहीर – अडीच लाख रुपये
– जुनी विहीर दुरुस्ती – 50 हजार रुपये
– इनवेल बोअरिंग – 20 हजार रुपये
– पंप संच – 20 हजार रुपये
– वीज जोडणी आकार – 10 हजार
– शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण – एक लाख रुपये
– ठिबक सिंचन – 50 हजार
– तुषार संच – 25 हजार
– परसबाग – 5 हजार रुपये
– पीव्हीसी पाईप – 30 हजार रुपये.

योजनेसाठी आवश्यक पात्रता :
– अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा असणे आवश्यक.
– सक्षम अधिकाऱ्याचे जात प्रमाणपत्र असावे.
– तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला.
– आधार कार्ड, बँक पासबुक असावे.
– स्वतःच्या नावावर किमान 0.40 हेक्टर जमीन.
– ज्या शेतकऱ्यांकडे विहिरी व्यतिरिक्त इतर लाभ घ्यायचा असेल त्यांच्याकडे 0.20 हेक्टर शेतजमीन असावी. कमाल 6 हेक्टरपर्यंत शेतजमीन असावी.
– आधारकार्ड व आधारकार्ड संलग्न बँकखाते असणे आवश्यक आहे.(आधारकार्ड व बँकखाते पासबुक प्रत)
– ग्रामसभेचा ठराव आवश्यक.
– प्रस्तावित विहीर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असावी.

अर्ज कसा करावा?
नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, पंप संच, वीज जोडणी, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, सूक्ष्म सिंचन संच (ठिबकसिंचन संच, तुषार सिंचन संच), परसबाग, पीव्हीसी पाईप आदींसाठी राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

follow us