राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत प्लॅस्टिक मल्चिंग अनुदान योजनेचा लाभ कोणाला, कसा घेता येईल?
Govt.Schemes : शासनाकडून आता तंत्रज्ञानयुक्त शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मल्चिंग पेपरचा (Plastic Mulching paper) वापर करुन शेती करण्यासाठी शासनाकडून या पेपरसाठी 50 टक्के अनुदान दिले जाते. शेतामध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करत असतात. शेतात मल्चिंग पेपरचा वापर करुन किडीचा प्रादुर्भाव, अतिउष्ण तापमान, अवकाळी पाऊस आदी नैसर्गिक आपत्तींचा सामना करता येतो.
चंद्रयान 3 च्या पाचपट पुढे जाणार आदित्य L1; तब्बल 14 कोटी 96 लाख किमी लांबून करणार सूर्याचा अभ्यास
प्लॅस्टिक मल्चिंग पेपरचे फायदे काय?
– मल्चिंग पेपरच्या वापरामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते.
– भाजीपाला, फळझाडांसह आदी पिकांभोवती मल्चिंग पेपरचे आच्छादन केल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही आणि जमिनीतील पाण्याचा ओलावा टिकून राहतो.
– मल्चिंग पेपरच्या वापरामुळे पावसाच्या पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप थांबते.
– नैसर्गिक आपत्तीपासून होणारी हाणी या पेपरच्या वापरामुळे टाळता येते.
इस्रोची Aditya-L1 सूर्य मोहीम कशी असणार ? वाचा ए टू झेड माहिती
अनुदान योजनेसाठी कोण पात्र?
– वैयक्तिक शेतकरी
– शेतकरी समूह
– बचत गट
– सहकारी संस्था
– शेतकरी उत्पादन संस्था
आवश्यक कागदपत्रे :
– रेशन कार्ड
– रहिवासी दाखला
– आधार कार्ड झेरॉक्स
– जमिनीचा 7/12 आणि 8 अ उतारा
– बँक पासबुकची झेरॉक्स
– पासपोर्ट साईज फोटो
– मोबाईल नंबर
– इमेल आयडी
अनुदान टक्केवारी :
– अनुसूचित जातींसाठी 16 टक्के आरक्षण
– अनुसूचित जमातींना 8 टक्के आरक्षण
– आदिवासी महिलांना 30 टक्के आरक्षण
शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार? :
सर्वसाधारणपणे प्रति हेक्टर जागेमध्ये मल्चिंग पेपरसाठी 32 हजार रुपये खर्च येतो. या योजनेसाठी शासनाकडून 50 टक्के अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत जास्तीत जास्त 2 हेक्टर जागेत मल्चिंग पेपर वापरासाठी अनुदान दिले जाते.
डोंगराळ भागामध्ये मल्चिंग पेपर वापरासाठी 37 हजार खर्च समजून त्यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाते.
अर्ज कसा करणार?
-अर्जदाराला सर्वात आधी Mahadbt च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
-होमपेजवर आल्यानंतर आधारकार्ड किंवा युजरनेम वापरून लॉगीन करावे लागणार आहे.
– त्यानंतर एक नवीन पेज समोर येईल, त्यामुध्ये कृषी विभागासमोरील अर्ज करा या बटणावर क्लिक करावे.
– त्यापुढे आणखी एक पेज समोर येईल, त्यात फलोत्पादनमधील बाबी निवडा या बटणवर क्लिक करा.
– त्यानंतर योजनेचा अर्ज उघडेल, त्यामध्ये आवश्यक असलेली सर्व माहिती भरून जतन करा यावर क्लिक करा, त्यानंतर तुमचा अर्ज भरला जाईल.
अधिक माहितीसाठी या ठिकाणी संपर्क साधा :
अर्जदाराने आपल्या जिल्ह्याच्या कृषी कार्यालयात जाऊन कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी, पर्यवेक्षक मंडळ, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.