अजित पवारांच्या सभेत मुर्दाडपणा, लोकांना सभेसाठी जबरदस्तीनं आणलं; वडेट्टीवारांचा हल्लाबोल

अजित पवारांच्या सभेत मुर्दाडपणा, लोकांना सभेसाठी जबरदस्तीनं आणलं; वडेट्टीवारांचा हल्लाबोल

Vijay Vadettiwar on Ajit Pawar : काल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची हिंगोलीत तर उपमुख्यमंत्री अजित पवारांची बीडमध्ये सभा झाली. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात जनतेच्या प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना चांगलचं धारेवर धरलं होतं. तर बीडमधील सभेतून शरद पवारांवर टीका केल्यानं कार्यकर्त्यांनी राडा केल्याचं पाहायला मिळाला. दरम्यान, यावरूनच आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) जोरदार टीका केली. अजित पवारांच्या सभेत मुर्दाडपणा होता, असं वक्तव्य त्यांनी केलं.

आज नागपुरात पत्रकारांशी बोलतांना वडेट्टीवार यांना अजित पवाराच्या बीडमधील सभेविषयी विचारले असता, ते म्हणाले की, कालच्या हिंगोलीतील उद्धव ठाकरेंच्या सभेला जिवंतपणा होता, तर अजित पवारांच्या सभेत मुर्दाडपणा होता. कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीच नाही, मग हे लोक जनतेला काय सांगणार? बेईमानी केली, पक्ष फोडला, जनतेसोबत दगाबाजी केली, हे सांगणार तरी काय? असा वडेट्टीवार म्हणाले.

अंबाबाईच्या नावानं उदो! आता भक्तांना घेता येणार गाभाऱ्यातून दर्शन, पालकमंत्र्यांची घोषणा 

ते म्हणाले की, बीडमध्ये अजित पवारांच्या सभेला लोकांना जबरदस्तीने आणण्यात आले. जनता आता त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसला फोडणाऱ्याची आता जिरवायची, असे जनतेनं ठरवलं आहे. त्यामुळे त्यांचे आता काही खरे नाही, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर पक्षात दोन गट पडले. हे दोन्ही गट राष्ट्रवादी आणि घड्याळ चिन्हावर दावा करत आहेत. हे प्रकरण आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचले. दरम्यान, कालच्या बीडच्या सभेत प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार गटाला पक्षासह चिन्हही मिळणार, असा दावा केला. अजित पवारांना ३० सप्टेंबरपर्यंत पक्षाचे चिन्ह मिळेल, असं ते म्हणाले. या पटेलांच्या दाव्याविषयी विचारले असता वडेट्टीवारांनी निवडणुक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

ते म्हणाले की, निवडणूक आयोग जो काही निर्णय देणार आहे, तो निर्णय गुपचूप पध्दतीने आधीच झालाही असेल. आणि तो निर्णय प्रफुल्ल पटेल यांना माहितही असेल म्हणून ते ठोसपणे दावे करत असावेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube