अंबाबाईच्या नावानं उदो! आता भक्तांना घेता येणार गाभाऱ्यातून दर्शन, पालकमंत्र्यांची घोषणा

कोल्हापूर : कोरोना काळात खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने सर्व धार्मिक स्थळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद केली होती. दरम्यान, कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने मंदिरे पुन्हा भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली. पण साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाईचे दर्शन पितळी उबऱ्याच्या बाहेरून घ्यावे लागत होते. मात्र आता भाविकांना अंबाबाईचे (Ambabai) दर्शन गाभाऱ्यातून घेता येणार आहे. हा निर्णय उद्यापासून लागू होणार आहे. याबाबतची घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केली. त्यामुळं भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
देवीचे रूप डोळ्यात साठवण्यासाठी दूरदूरवरून भाविक येतात. मात्र त्यांना गाभाऱ्यातून दर्शन घेत येत नव्हतं. मात्र उद्यापासून म्हणजेच २९ ऑगस्टपासून भाविकांसाठी अंबाबाई देवीचे गाभारा दर्शन सुरू होणार आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात बंद असलेले गाभारा दर्शन अखेर सुरू करण्यात आले आहे. काही गर्दीचे दिवस वगळता भाविक अंबाबाईचे दर्शन घेऊ शकतात. त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
मुकेश अंबानींची मोठी घोषणा; गणेश चतुर्थशीपासून लाँच होणार Jio Air Fiber
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नेहमीच भाविकांची वर्दळ असते. दर्शनासाठीही लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे कोरोना काळात संसर्ग अधिक वाढू नये, यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार गाभाऱ्यातून भाविकांना दर्शन बंद घेणं बद केलं करून दूरून दर्शन घेण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळं पितळी उंबराच्या बाहेरुन दर्शन सुरू होतं. यानंतर संसर्ग कमी झाल्यानंतर शासनाने कोरोनाचे सर्व नियम हटवल्यानंतर देखील मंदिर समितीकडून दर्शन रांगते बदल करण्यात आला नव्हता. कारण, मंदिरात सुशोभीकरणाचे काम सुरू होतं.
दरम्यान, अनेक व्हिआयपी लोकांना गाभाऱ्यातून दर्शन दिलं जात असल्यानं अनेक भक्तामधून संताप व्यक्त करण्यात येत होता. तसेच सर्वसामान्यांना देखील गाभाऱ्यातून दर्शन सुरू करण्यात यावे, अशी मागणी वारंवार कऱण्यात येत होती. अखेर उद्यापासून हे दर्शन सुरू होणार असून भक्तामधून समाधान व्यक्त होते आहे.