मुकेश अंबानींची मोठी घोषणा; गणेश चतुर्थशीपासून लाँच होणार Jio Air Fiber

मुकेश अंबानींची मोठी घोषणा; गणेश चतुर्थशीपासून लाँच होणार Jio Air Fiber

Jio Air Fiber : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळामध्ये आज मोठी खांदेपालट करण्यात आली. आकाश अंबानी, अनंत आणि ईशा अंबानी यांना या संचालक मंडळात जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर रिलायन्सच्या बहुप्रतिक्षित जिओ एअर फायबरच्या लॉंचिंगबद्दल मोठी घोषणा करण्यात आली. आज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी जिओ फायबर गणेश चतुर्थीला म्हणजेच 19 सप्टेंबरला लॉन्च करण्याची घोषणा केली.

RIL AGM 2023: ईशा, आकाश आणि अनंत अंबानी यांची RIL बोर्डावर नियुक्ती, नीता अंबानी बाहेर

यावेळी मुकेश अंबानी यांनी सांगितले की, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने मागील 10 वर्षांमध्ये 150 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. ही भारतीय कॉर्पोरेट कंपनीकडून केलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक मानली जात आहे. रिलायन्स हा नवीन भारताचा आश्रयदाता असल्याचेही यावेळी मुकेश अंबानी यांनी सांगितले.

Subhedar ने बॉक्स ऑफिसचा गड ही केला सर; पहिल्या विकेंडला गाठला कोट्यावधींचा टप्पा

जिओ एअर फायबरसाठी दररोज 150,000 कनेक्शन देण्याची क्षमता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. जिओ एअर फायबरचं लॉंचिंग गणेश चतुर्थी म्हणजेच 19 सप्टेंबरला लॉन्च केले जाणार आहे.

त्यांच्याकडून सांगण्यात आले की, जिओ 5G मध्ये आपल्या अर्थव्यवस्थेमधील सर्वच क्षेत्रांमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणण्याची ताकद आहे. यामध्ये कृषी, शिक्षण, एमएसएमईसह आरोग्य सेवा यांचाही समावेश असणार आहे.

मुकेश अंबानी म्हणाले की 2022-23 मध्ये रिलायन्स रिटेलचे उत्पन्न 2,60,364 लाख कोटी रुपये आहे तर कंपनीने 9181 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

कतार गुंतवणूक प्राधिकरणाने (QIA) गेल्या आठवड्यात रिलायन्स रिटेलमधील एक टक्का हिस्सा खरेदी केल्याचा संदर्भ देत मुकेश अंबानी म्हणाले की, या गुंतवणुकीनंतर रिलायन्स रिटेलचे मूल्यांकन 4.28 लाख कोटी रुपयांवरुन 8.278 लाख कोटी रुपये झाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube