Government Schemes : संपूर्ण महाराष्ट्रासह (Maharashtra)देशभरात लखपती दीदी योजनेची (Lakhpati Didi Scheme)जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगावमध्ये (Jalgaon)लखपती दीदी योजनेचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर लखपती दीदी योजना जोरदारपणे चर्चेत आली. ही लखपती दीदी योजना नेमकी आहे तरी काय? यासाठी कोण अर्ज करु शकतं? कुठे अर्ज पाठवायचा? काय फायदा मिळतो? जाणून घेऊया सविस्तर…
Badlapur Rape Case : धक्कादायक! शाळेचे सीसीटीव्ही फुटेजच गायब, केसरकरांनी सांगितलं
केंद्र सरकारने आत्तापर्यंत विविध योजना आणल्या आहेत. काही वर्षांपासून महिला सशक्तिकरणावर सरकारकडून विशेष भर दिला जात असल्याचे पाहायला मिळाले. महिलांची आर्थिक, सामाजिक प्रगती होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातच आता सरकारकडून लखपती दीदी योजना राबवली जात आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने ही योजना चालू केली आहे. उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांना पाच लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. केंद्राकडून देशभरात एकूण तीन कोटी महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
Video : हे मला काढायला ठेवलं का?, नव्या इमारतीच्या पायरीवर पाय ठेवताच अजितदादा भडकले
– या योजनेअंतर्गत देशभरातील खेड्यातील दोन कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते.
– या प्रशिक्षणात महिलांना प्लंबिंग, एलईडी बल्ब बनवणे आणि ड्रोन चालवणे आणि दुरुस्ती करणे अशा अनेक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते.
– त्यानंतर स्वत:चा उद्योग उभा करण्यासाठी या महिलांना एक लाख रुपयांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.
– ही योजना प्रत्येक राज्यातील स्वयं-सहायता गटांमार्फत चालविली जाते.
– महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, महिलांमध्ये स्वयंरोजगाराची निर्मिती होण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.
योजनेसाठी आवश्यक अटी :
– लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसायला हवा.
– अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
– अर्जदार महिलेचे वय 18 ते 50 दरम्यान असावे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
लखपती दीदी योजनेत सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे.
– आधार कार्ड
– पॅन कार्ड
– उत्पन्नाचा दाखला
– बॅंक पासबुक
– पासपोर्ट साइज फोटो
– मोबाईल नंबर
योजनेसाठी अर्ज कुठे करायचा?
– लखपती दीदी योजनेचा लाभ मिळवायचा असल्यास महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एका उद्योगाचे नियोजन करावे लागेल.
– या उद्योगाचा आराखडा सरकारला पाठवला जाईल.
– या आराखड्याचा तसेच लखपती दीदी योजनेसाठीच्या अर्जाची सरकार पडताळणी करेल.
– त्यानंतर सर्व अटींची पूर्तता होत असल्यास त्या महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.
टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.