Government Schemes : सागरी मत्स्य व्यवसाय 6 महिन्याचे प्रशिक्षण योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?

महाराष्ट्र शासनाने सातपाटी व वसई (ठाणे), वर्सोवा (मुंबई), आलिबाग (रायगड), रत्नागिरी (रत्नागिरी) व मालवण (सिंधुदूर्ग) येथे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत.

Government Schemes

Government Schemes

Government Schemes : नौकांचे यांत्रिकीकरणाद्वारे प्रगत मच्छिमारी तंत्राचा (Fishing techniques)अवलंब करून सागरी मत्स्योत्पादन (Marine Fisheries)कसे वाढवावे? याचे मच्छिमार युवकांना सर्वांगिण प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सातपाटी व वसई (ठाणे), वर्सोवा (मुंबई)(Mumbai), आलिबाग (रायगड), रत्नागिरी (रत्नागिरी) व मालवण (सिंधुदूर्ग) येथे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत. या केंन्द्रात सागरी मत्सव्यवसाय नौकानयन, सागरी मासेमारी पध्दती, नौका इंजिनाची देखभाल व परिरक्षण आदीचे प्रशिक्षण देण्यात येते.

मोठी बातमी : पुढील आदेशापर्यंत NEET UG समुपदेशन पोस्टपोन; SC च्या निकालानंतर निर्णय

योजनेच्या प्रमुख अटी :
– प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार असावा.
– प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान वर्षाचा अनुभव असावा.
– प्रशिक्षणार्थी १८ ते ३५ वयोगटातील असावा.
– प्रशिक्षणार्थीने शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक.
– प्रशिक्षणार्थी किमान ४ थी पास असावा व लिहिता वाचता येणे आवश्यक.
– प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक.
– प्रशिक्षणार्थीस मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस आवश्यक.

विश्व विजेता टीम इंडिया भिडणार झिम्बाब्वेशी, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सामना

आवश्यक कागदपत्रे : पात्रतेसंदर्भातील कागदपत्रे.

लाभाचे स्वरूप असे :
– प्रशिक्षण कालावधी – ६ महिने.
– प्रशिक्षण सत्रे – २ सत्रे (१ जानेवारी ते ३० जून व १ जुलै ते ३१ डिसेंबर).
– प्रशिक्षणार्थी क्षमता – २२ प्रशिक्षणार्थी प्रति सत्र प्रशिक्षणार्थी

प्रशिक्षणार्थी शुल्क– दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थीस दरमहा १०० रुपये /-
दारिद्रय रेषेवरील प्रशिक्षणार्थीस दरमहा ४५० रुपये /-

या ठिकाणी संपर्क साधावा : संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय.

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

Exit mobile version