मोठी बातमी : पुढील आदेशापर्यंत NEET UG समुपदेशन पोस्टपोन; SC च्या निकालानंतर निर्णय

  • Written By: Published:
मोठी बातमी : पुढील आदेशापर्यंत NEET UG समुपदेशन पोस्टपोन; SC च्या निकालानंतर निर्णय

NEET UG Counselling Deferred Until Further Notice : नीट प्रवेश परिक्षांच्या काल (दि.5) नव्या तारखांची घोषणा करण्यात आल्यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली असून, सर्वोच्च न्यायालयाने (NEET) UG चे समुपदेश पुढे ढकल्यास नकार दिल्यानंतर आता हे समुदेशन पुढील आदेशयेईपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी हे समुपदेशन पुढील सूचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. (NEET-UG) समुपदेशन 2024 ची प्रक्रिया आजपासून ( दि.6 ) सुरू होणार होती.

तारखा जाहीर होण्याची शक्यता Video : मी फडणवीसांना मुख्यमंत्र्याचं मंत्री केलं;लेट्सअप च्या दणकेबाज मुलाखतीत पवार काय म्हणाले?

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आज होणारी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा अंडरग्रेजुएट समुपदेशन पुढं ढकललं आहे. दरम्यान याबाबत शिक्षण मंत्रालयाकडून नवीन तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने समुपदेशनाला विलंब करण्यास नकार दिल्याने हा निर्णय आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 08 जुलैनंतर समुपदेशन प्रक्रिया सुरू होऊ शकते. 08 जुलै रोजी तारखा जाहीर होण्याची अपेक्षा आहे. मात्र, अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, संपूर्ण समुपदेशन वेळापत्रक एमसीसी लवकरच जाहीर करू शकते. समुपदेशन करताना कोणती कागदपत्रे आवश्यक असतील हे सांगितले जाईल. याशिवाय त्यासंबंधीची इतर माहितीही वेळापत्रकात असेल.

परिक्षार्थींची मोठी संख्या पुणे हादरलं!ड्रंक अँड ड्राईव्ह;ची कारवाई केल्याने महिला पोलिसाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

NEET UG परीक्षेला दरवर्षी लाखो उमेदवार बसतात. यावर्षी 24 लाख उमेदवार परीक्षेला बसले होते. निकाल आल्यानंतर गदारोळ झाला. वास्तविक या परीक्षेत एक-दोन नाही तर 67 टॉपर्स होते. त्यानंतर एनटीएवर प्रश्न उपस्थित गेले गेले. एजन्सीने ग्रेस गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना दोन पर्याय दिले होते. एकतर त्याने ग्रेस मार्क्स सोडावे नाहीतर फेरपरीक्षेत बसावे. अशा स्थितीत अनेक उमेदवार फेरपरीक्षेत बसले नाहीत. पुनर्परीक्षेचा निकालही नुकताच आला आहे. अशा स्थितीत समुपदेशन पुढे ढकलण्याचा निर्णय का घेतला गेला याची पुष्टी करणं कठीण झालं आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube