Download App

किसान क्रेडिट कार्ड योजना आहे तरी काय? कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Government Schemes : केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी (Farmer)अनेक योजना राबवल्या जातात. मात्र अनेक शेतकऱ्यांना या योजनांविषयी माहिती होत नाही. त्यामुळे ते शेतकरी या योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळण्यासाठी सरकारकडून (Central Govt)किसान क्रेडिट कार्ड योजना (Kisan Credit Card Scheme)सुरु करण्यात आली आहे. या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे नेमकी कोणती? या योजनेचा फायदा नेमका कसा होणार? हेच आपण जाणून घेऊया.

शिंदेंची पुन्हा कोंडी! दहावी-बारावीच्या विद्यार्थांचा विचार करत जरांगेंनी जाहीर केला मायक्रो प्लॅन

किसान क्रेडिट कार्ड एक प्रकारचे क्रेडिट कार्ड आहे. ते शेतकऱ्यांसाठी पीक उत्पादनासाठी, शेतीसाठी आवश्यक कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी त्याचबरोबर शेतीसाठी आवश्यक इतर काही गोष्टींच्या खर्चासाठी कर्ज पुरवले जाते. या क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांच्या कृषी गरजा पूर्ण केल्या जातात.

आणखी एका पुतण्याचे काकांना आव्हान! अजितदादांविरोधात शड्डू ठोकणारे युगेंद्र पवार कोण आहेत?

क्रेडिट कार्डसाठी पात्रता काय?
आपल्या शेतात शेती करणारा शेतकरी असेल किंवा दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करणारा शेतकरी असेल, तो देखी किसान क्रेडिट कार्ड बनवू शकतो. शेतकऱ्याचे वय 18 वर्षे ते 75 वर्ष असणे आवश्यक आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अर्जदारांसाठी सह-अर्जदार असणे आवश्यक आहे. तो अर्जदाराचा जवळचा नातेवाईक असावा. सह-अर्जदाराचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असावे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
– अर्जदाराचे पॅनकार्ड
– अर्जदाराचे आधार कार्ड
– अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
– शपथपत्र, ( तुम्ही इतर कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतले नसल्याची माहिती असणे आवश्यक)

योजनेचे फायदे काय मिळणार?
किसान क्रेडिट कार्ड बनवल्यानंतर शेतकरी 9 टक्के व्याजाने 3 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज घेता येतं. तसेच सरकारकडून त्या व्याजावर दिलासा देत 2 टक्के सबसिडी दिली आहे. शेतकऱ्याने वेळेपूर्वी व्याज भरलं तर त्याला सरकारकडून वेगळी 3 टक्के सबसिडी दिली जाते. अर्थातच तुम्हाला फक्त 4 टक्के एकूण व्याज द्यावं लागणार आहे.

क्रेडिट कार्ड कसं बनवावं?
– तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी, किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे. किसान क्रेडिट कार्ड फॉर्म येथे डाउनलोड करावा.

– फॉर्म भरा आणि फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रे जोडून तुमच्या जवळच्या बँकेत सबमिट करा. यानंतर, बँकेकडून तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड जारी केले जाते. तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेतूनही फॉर्म मिळवू शकता.

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

follow us