Government Schemes : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना दि. 14 एप्रिल 2021 ते 6 डिसेंबर 2021 या दरम्यान प्राधान्याने महावितरणद्वारे (Mahavitaran)घरगुती ग्राहकांसाठी वीजजोडणी करुन देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना (Dr. Babasaheb Ambedkar Jeevan Prakash Yojana)राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने (Government of Maharashtra)घेतला आहे. त्याचबरोबर या योजनेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या असंघटित उद्योगांमध्ये वीजपुरवठासंबंधित (power supply)असणाऱ्या तक्रारी किंवा समस्यांचे निवारण करण्याबाबतही समावेश करण्यात येणार आहे.
“इथला असो किंवा बाहेरचा, सोलापूरची लेक म्हणून मी स्वागत करते” : प्रणितींनी सेट केला प्रचाराचा अजेंडा
योजनेसाठी अटी व पात्रता :
– या योजनेतील घरगुती वीज जोडणी जोडणी करणाऱ्या लाभार्थ्यांना लागू असणाऱ्या अटी व पात्रता खालील प्रमाणे असणार आहे.
– लाभार्थी अर्जदाराकडे सक्षम प्राधिकारी कार्याचा जाती प्रमाणपत्र आवश्यक राहील.
– अर्जदारांनी अर्ज केल्याच्या ठिकाणी यापूर्वीची थकबाकी नसावी.
आवश्यक कागदपत्रे
– आधार कार्ड
– रहिवासी दाखला
मराठ्यांनंतर धनगर समाजानेही रान पेटवलं; 15 मतदारसंघात निवडणूक लढणार…
जाणून घ्या योजनेची कार्यपद्धती :
– लाभार्थी अर्जदाराने महावितरणाच्या विहित नमुन्यात कागदपत्रासह ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज करावा.
– अर्जदाराने शासनमान्य विद्युत कंत्राटदारांकडून वीज मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.
– लाभार्थ्याने 500 रुपये इतकी अनामत रक्कम महावितरणकडे जमा करणे आवश्यक राहील सदर रक्कम 5 समान मासिक हप्ता मध्येच भरण्याची सुविधा असेल.
– अर्जदारांचा परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर मा.महाराष्ट्र विद्युतनियमक आयोगाचा यासंदर्भातील अस्तित्वात असणाऱ्या तरतुदीचा अधीन राहून वीज जोडणी उपलब्ध करण्यात येईल.
– महावितरणद्वारे प्राप्त अर्जानुसार वीज जोडणी नाही, अशा लाभार्थ्यांना विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील 15 कार्यालयीन दिवसात वीज जोडणी उपलब्ध करण्यात येणार आहे.
-याशिवाय अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या असंघटित उद्योगांमधील वीज समस्याचे प्राधान्याने निराकरण होण्याच्या दृष्टीने महावितरण स्तरावर प्रत्येक महामंडळातील किंवा जिल्हा स्तरावर अधीक्षक अभियंता अध्यक्षतेखाली यांच्या कार्यक्षेत्रात करिता कृषी दलाची स्थापना करण्यात येईल.
(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)