Government Schemes : किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत (Kisan Credit Card Schemes)शेतकऱ्यांना (Farmer)बँकांमार्फत एक कार्ड दिले जाते. कीटकनाशके,खत, बियाणे आदी शेतीविषयक गोष्टींसाठी शेतकर्यांकडे पैसे नसतात, त्यामुळे ते सावकारांकडून कर्ज काढतात. त्या कर्जाचा व्याजदर जास्त असतो. त्यामुळे कर्ज उपलब्ध करुन देणे हे या किसान कार्डचे मुख्य उद्दीष्ट आहे. दुसरे म्हणजे सावकारांकडून कर्ज घेण्याची गरज नाही. कारण ते मनमानी व्याज वसूल करतात.
Rohit Saraf : ठरलं तर! मिसमॅच्ड 3 लवकरच येणार, रोहितने दिली खुशखबर
किसान क्रेडिट कार्डअंतर्गत घेतलेले कर्ज 2-4 टक्क्यांनी स्वस्त शेतकऱ्यांसाठी दिले जाते. मात्र यासाठीची अट अशी आहे की, ते कर्ज शेतकऱ्याला वेळेवर परत करावे लागते. जर तुम्ही शेतकरी आणि तुम्ही अद्याप किसान कार्ड काढले नसल्यास लवकरच हे कार्ड काढून घ्या. कारण किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून शेतकर्यांना शेतीशी संबंधित कामांसाठी कर्ज दिले जाते. या कर्जाचा व्याजदर देखील कमीच असतो.
धारावीसाठी उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या मोडमध्ये; ऑफिस तुमचं असलं तरी रस्ते आमचे
त्यामुळे हे कर्ज घेणे खूप स्वस्त आहे. किसान क्रेडिट कार्ड पीएम किसान सन्मान निधी योजनेशी जोडले गेले आहेत. किसान कार्ड अंतर्गत पशुसंवर्धन व मत्स्यपालनास 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.
योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
– किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचं किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 75 वर्षे असणं आवश्यक आहे.
– अर्जदार शेती, मत्स्यपालन व पशुसंवर्धनाशी जोडलेली कोणतेही व्यवसाय करत असेल, तर तुम्ही किसान क्रेडिट कार्ड मिळण्यास पात्र ठरता.
– शेतकरी स्वत:च्या जमिनीवर शेती करीत असला, तरी तो त्याचा फायदा घेऊ शकतो.
– जर शेतकर्याचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक असल्यास त्या शेतकऱ्याने फॉर्म भरल्यानंतर तो अर्जदार पात्र आहे की नाही हे बँकेकडून सांगण्यात येईल.
अर्ज कुठे करायचा? :
या योजनेसाठी पात्र आणि इच्छूक शेतकरी अर्ज करण्यासाठी https://pmkisan.gov.in या केंद्र सरकारच्या किसान क्रेडिट कार्डच्या अधिकृत संकेतस्थाळावर जाऊन अर्ज करता येईल.
– क्रेडिट कार्ड योजनेचा फॉर्म हा शेतकऱ्याला त्याच्या जमीनीच्या कागदपत्रांसह आणि पिकाच्या तपशीलाने भरावा लागेल.
– आपण दुसऱ्या कोणत्याही बँक किंवा शाखेतून दुसरे किसान क्रेडिट कार्ड बनवले नाही, याची देखील माहिती देखील द्यावी लागेल.
– त्यानंतर आपण तो अर्ज वाचून नीट भरा आणि सबमिट बटनावर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला संबंधित बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड येईल.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
– आधार कार्ड
– पॅन कार्ड
– शेतजमिनीचा उतारा
– एक पासपोर्ट आकाराचा फोटो
ज्या शेतकर्यांना क्रेडिट कार्ड घ्यायचे आहे त्यांनी या कागदपत्रांसह प्रतिज्ञापत्र बँकेत जमा करणे आवश्यक असते. त्यामध्ये यापूर्वी आपण दुसऱ्या कोणत्याही बँकेकडून अद्याप कर्ज घेतले नाही, असे लिहून द्यावे लागते.
– वरील कागदपत्रे बँकेत घेऊन जाऊन तुम्ही किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करु शकता. त्यानंतर काही दिवसातच तुम्हाला ते मिळेल.
किसान क्रेडिट कार्ड हेल्पलाइन नंबर :
जर काही मदत हवी असल्यास किंवा बँक लोन देत नसेल, तर किसान क्रेडिट कार्ड हेल्पलाइन नंबर – 0120-6025109 / 155261. यावर संपर्क करु शकता.
(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.