Government Schemes : असंघटित क्षेत्रात काम करणार्या मजुरांना वयाच्या 60 वर्षांनंतर उदरनिर्वाह करण्यासाठी केंद्र सरकारने (Central Govt)पेन्शन योजना (Pension Scheme)सुरु केली. या योजनेला पंतप्रधान प्रधानमंत्री मानधन योजना (Prime Minister Pradhan Mandhan Mandhan Yojana)आहे. त्यामध्ये मजूर, वीटभट्टी, चप्पल बनवणारे, कचरा वेचणारे, घरगुती कामगार, कपडे धुणारे, रिक्षाचालक, भूमीहीन मजूर, विडी कामगार आणि रोजंदारी कामगार यांना पेन्शन दिली जाते. त्याचबरोबर मासिक 15,000 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मजुरांना या योजनेत समाविष्ट केले जाते.
पुणे बुक फेस्टिवल वादात : JNU सह सात विद्यापीठांवरील पुस्तकाच्या चर्चेचा कार्यक्रम रद्द
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेंतर्गत मजुरांच्या वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना मासिक 3 हजार रुपयांपर्यंत पेन्शन देण्याची योजना आहे. यादरम्यान पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास, पेन्शनच्या 50 टक्के रक्कम जोडीदाराला दिली जाते.
अरबाज खान पुन्हा चढणार बोहल्यावर! मेकअप आर्टिस्टसोबत बांधणार लग्न गाठ
योजनेचा लाभ कसा मिळणार?
– प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी मजुरांना नोंदणी करावी लागेल.
– सरकारी आकडेवारीनुसार देशभरात असंघटित क्षेत्रात सुमारे 42 कोटी मजूर काम करतात.
– या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगाराचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे आणि 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांना दरमहा 55 ते 200 रुपये गुंतवावे लागतील. कामगाराचे वय 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून पेन्शन सुरु केली जाते.
हे लोक करू शकणार नाहीत अर्ज :
– EPFO, NPS आणि ESIC चे सदस्य प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत अर्ज करु शकणार नाहीत.
– याशिवाय करदात्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
– केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेंतर्गत फक्त असंघटित क्षेत्रातील कमी वेतनावर काम करणार्या मजुरांनाच लाभ मिळू शकतो.
अर्ज कसा करावा :
– प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी http://www.maandhan.in या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
– यानंतर सेल्फ एनरोलमेंट वर क्लिक करावा आणि तुमचा मोबाईल नंबर टाका. त्यानंतर Proceed वर क्लिक करा.
– नाव, ई-मेल आणि कॅप्चा कोड एंटर करा आणि जनरेट OTP वर क्लिक करा. OTP टाका.
– यानंतर अर्जाचे पान उघडेल. मागितलेली माहिती नोंदवा आणि सबमिट करा.
📍 टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.