पुणे बुक फेस्टिवल वादात : JNU सह सात विद्यापीठांवरील पुस्तकाच्या चर्चेचा कार्यक्रम रद्द

पुणे बुक फेस्टिवल वादात : JNU सह सात विद्यापीठांवरील पुस्तकाच्या चर्चेचा कार्यक्रम रद्द

पुणे : येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु असलेला पुणे बुक फेस्टिवल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या फेस्टिवलमध्ये साधना प्रकाशनाच्या, राजन हर्षे लिखित “पक्षी उन्हाचा : सात विद्यापीठांच्या आवारात” या पुस्तकावर आज (गुरुवार) होणारा चर्चेचा कार्यक्रम नॅशनल बुक ट्रस्टकडून (एन. बी. टी.) ऐनवेळी रद्द करण्यात आला असल्याचा आरोप साधना प्रकाशनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी केला आहे. या निर्णयाचा निषेध करुन हा कार्यक्रम आता उद्या (शुक्रवारी) सकाळी 10.30 वाजता, टिळक रोडवरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात होणार असल्याची माहितीही शिरसाठ यांनी दिली.

याबाबत बोलताना शिरसाठ म्हणाले, 16 ते 24 डिसेंबर या काळात होणाऱ्या या महोत्सवात पुस्तक आणि लेखक यांच्याशी संबंधित कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास प्रस्ताव द्यावा , असे पत्र एन.बी. टी. ने पाच डिसेंबर रोजी अन्य अनेक प्रकाशकांसह साधना प्रकाशनालाही पाठवले होते. त्यानुसार आठ डिसेंबर रोजी साधना प्रकाशनाने, राजन हर्षे लिखित “पक्षी उन्हाचा : सात विद्यापीठांच्या आवारात” या नव्या पुस्तकावरील चर्चेचा प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावाला उत्तर देताना , या संदर्भात आमच्या प्रतिनिधी आकांक्षा बिष्णोई यांच्या संपर्कात राहावे , असे एन. बी. टी.ने कळवले होते.

Pune : सामान्य तरूणाच्या प्रश्नाला उत्तर देण्यास चंद्राकांतदादांचा नकार; दिले चौकशीचे आदेश

त्यानंतर 12 डिसेंबर रोजी, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या गेस्ट हाऊस आकांक्षा आणि त्यांच्या सहकारी निहारिका यांची भेट घेतली होती. तेव्हा सुहास पाटील, गोपाळ नेवे व साईनाथ जाधव हे साधनाचे तीन सहकारीही उपस्थित होते. त्या भेटीतच आकांक्षा व निहारिका यांनी महोत्सवाचे वेळापत्रक पाहून, 21 डिसेंबर दुपारी दोन ते तीन ही एक तासाची वेळ निश्चित केली होती. लेखक डॉ. राजन हर्षे हे फर्ग्युसनचे माजी विद्यार्थी असल्याने आणि कार्यक्रमाला येणारा वाचक समूह लक्षात घेऊन फर्ग्युसनचे अँफी थियेटर हे स्थळही कार्यक्रमासाठी तेव्हाच त्यांनी निश्चित केले होते, कार्यक्रमाचे पाहुणे व स्वरुप कळविण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे, चर्चेचे स्वरूप व वक्त्यांची नावे त्यांना दुसऱ्या दिवशी कळवण्यात आली होती.

अलाहाबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू असलेले लेखक डॉ. राजन हर्षे, नांदेड येथील स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, मुंबई विद्यापीठाचे माजी रजिस्ट्रार डॉ. सतीश बागल हे चौघे या पुस्तकावर चर्चा करणारे होते. डॉ. संकल्प गुर्जर हे या चर्चेचे संचलन करणार होते.कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी साधनाचे सुहास आणि सुदाम हे दोन सहकारी आकांक्षा यांना भेटले तेव्हा त्यांनी कार्यक्रमाचे स्थळही अँफी थियेटर ऐवजी बुक कट्टा दाखवले होते. मात्र कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी सायंकाळी सात वाजता आकांक्षा बिष्णोई यांनी फोन करून कळवले की, महोत्सवाच्या ठिकाणी अनेक कार्यक्रम होणार असल्याने तुमचा कार्यक्रम रद्द करावा लागत आहे.

Pune : सामान्य तरूणाच्या प्रश्नाला उत्तर देण्यास चंद्राकांतदादांचा नकार; दिले चौकशीचे आदेश

या पुस्तकाचा विषय, कार्यक्रमाला येणारे निमंत्रित वक्ते आणि साधना प्रकाशनाचा पाऊण शतकाचा वारसा हे सर्व लक्षात घेता, कार्यक्रम रद्द झाल्याचे असे ऐनवेळी सांगणे योग्य नाही, असे शिरसाठ यांनी आकांक्षा यांना सांगितले. तेव्हा, वरिष्ठांशी बोलून थोड्या वेळाने फोन करून सांगते, असे त्या म्हणाल्या. मात्र अर्धा तासाने फोन करून त्यांनी, कार्यक्रम रद्दच करावा लागत आहे असे कळवले. त्यामुळे, या निर्णयाचा आम्ही निषेध करीत आहोत. मात्र सर्व वक्त्यांची वेळ व हॉलची उपलब्धता हे सर्व काल रात्री ठरवले असून, तेच सर्व वक्ते घेऊन तो कार्यक्रम शुक्रवार 22 डिसेंबर 2023 रोजी, सकाळी 10.30 वाजता, टिळक रोडवरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात पार पडणार आहे, अशी माहितीही शिरसाठ यांनी सांगितले.

काय होते पुस्तकात?

विद्यार्थी, प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक आणि प्रशासक या पाच प्रकारच्या भूमिका निभावताना डॉ. राजन हर्षे हे पुणे, जेएनयू (दिल्ली), सियान्स पो (पॅरिस), कोलंबिया (न्यू यॉर्क), हैदराबाद, अलाहाबाद आणि एसएयू (दिल्ली) या सात विद्यापीठांच्या आवारात वावरले आहेत. तब्बल पाच दशकांच्या या प्रवासाचे एका जिप्सी वृत्तीने डॉ. हर्षे यांनी केलेले अनुभवकथन, आत्मनिरीक्षण आणि आत्मपरीक्षण या पुस्तकात आहे. या पुस्तकात बारा दीर्घ लेख आहेत. व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टिकोन, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टीक्षेप आणि आजच्या समाज जीवनावर भाष्य हे चार घटक या लेखनाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे हे पुस्तक आत्मकथनात्मक वाटणारे पुस्तक असले तरी, एक प्रकारचे कार्यकथन आहे.

JNU, हैदराबाद, अलाहाबद या विद्यापीठांवरील भाष्यामुळे कार्यक्रम रद्द?

दरम्यान, JNU, हैदराबाद, अलाहाबद या विद्यापीठांवरील भाष्यामुळे कार्यक्रम रद्द केला असावा का? असा सवाल विचारले असता शिरसाठ म्हणाले, असे कोणतेही कारण एनबीटीने दिलेले नाही. त्यांनी केवळ इतर कार्यक्रमांमुळे कार्यक्रम रद्द करावा लागत असल्याचे कारण सांगितले आहे. मात्र पुस्तकात जरी JNU, हैदराबाद, अलाहाबद या विद्यापीठांवरील भाष्य असले तरीही ते पूर्णपणे हर्षे यांच्या अनुभवावर आहे. त्यात अक्षेपार्ह असे राजकीय भाष्य नाही. जे काही आहे ते बॅलेन्स लेखन आहे. कोणत्याही एका पक्षाबद्दल त्यात लिहिण्यात आलेले नाही. बहुदा साधना आणि पुरोगामी या दोन कारणांमुळे तो रद्द करण्यात आला असावा, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube