Download App

अनुसूचित जातीच्या लाभार्थींना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणे

LetsUpp l Govt. Schemes

अनुसूचित जातीच्या (Scheduled caste)लाभार्थींना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण (Training in Animal Husbandry)देऊन कौशल्य विकास वृद्धीसाठी वैयक्तिक लाभ देण्यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. (govt-schemes-training-in-animal-husbandry-to-scheduled-caste-beneficiaries)

Ajit Pawar : संघटनेत काम करायची इच्छा व्यक्त केली तर काय चुकलं?

योजनेसाठी अटी :
प्रशिक्षण कालावधी 3 दिवसांचा राहील.
प्रशिक्षणासाठी अर्जदारास जनावरांच्या प्रक्षेत्रावर, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, शेळी मेंढी विकास महामंडळ, भारतीय कृषि औद्योगीक प्रतिष्ठान, कृषि व पशुवैद्यकीय महाविद्यालय या ठिकाण अथवा प्रक्षेत्रावर प्रशिक्षण घेणे शक्य नसल्यास इतर ठिकाणी सोईनुसार प्रशिक्षणास उपस्थित रहावे लागेल.
प्रशिक्षणार्थींना प्रक्षेत्रावरच प्रात्यक्षिक काम करावे लागेल.
यात प्रक्षेत्रावरील गायी म्हशीचे व्यवस्थापन यामध्ये मुख्यत: संकरीत पैदाशीचे, तंत्रज्ञान, ऋतूचक्र, माज ओळखणे, कृत्रिम रेतन, गाभण गाई/ म्हशींची निगा, जन्मलेल्या वासरांचे संगोपन, खाद्य-वैरणीचे प्रकार व उत्पादन तंत्रज्ञान, दुग्धस्पर्धा स्वच्छ दुग्धोत्पादन, जनावरांना होणारे रोग व त्यानूसार रोगप्रतिबंधक लसीकरण, औषधोपचार,सहकारी संस्थेचे सभासदत्त्व इ. बाबतची माहिती घ्यावी लागेल.
शेळयांमध्ये संकरीत पैदास, जन्मलेल्या करडाची जोपासना, नर विक्री बाबत बाजार व्यवस्था व शेळीपालन प्रकल्प अर्थशास्त्र याबाबतची माहिती घ्यावी लागेल.
प्रशिक्षणार्थींना प्रगतीशील शेतकऱ्यांकडे सहल / बचत गटांना भेटी देणे, त्यानूसार त्यांचेकडील जनावरांच्या जोपासनेबाबत प्रात्यक्षिक पहाणे. जवळच असलेली प्रक्षेत्रे दुधमहासंघ, शेळया मेंढयाचे प्रक्षेत्रे यांना भेटी देणे आवश्यक आहे.

Aani Baani: विनोदाची ‘आणीबाणी’ प्रेक्षकांच्या भेटीला, झळकणार हे कलाकार

लाभाचे स्वरूप :
प्रशिक्षण कालावधीत एका लाभार्थीवर रु.1,००० /- मर्यादेपयंर्तचा खर्च खालीलप्रमाणे-
लाभार्थ्यांना चहा, नाष्टा जेवण 300 (रु.100/- प्रतिदिवस)
जाण्या येण्याचा खर्च (एसटी / रेल्वे तिकीट पाहुन) :100/-
पेन, नोंदवही, छापील तांत्रिक माहिती :100/-
दृकश्राव्य व्यवस्था प्रचार, बॅनर्स, चार्टस (ट्रेनिंग एड मटेरीयल अंतर्गत) प्रशिक्षणार्थी बैठक व्यवस्था हॉल इ. अनुषंगिक खर्च : 500/-
एकुण : 1000/-

आवश्यक कागदपत्रे :
लाभार्थीं निवडताना संबंधीत ग्रामपंचायतीची शिफारस प्राप्त करून घेणे बंधनकारक राहील
फोटो ओळखपत्राची सत्यप्रत
जातीच्या दाखल्याची सत्यप्रत

संपर्क कार्यालयाचे नाव :
पशुधन विकास अधिकारी (विस्तार),पंचायत समिती
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त

Tags

follow us