Ajit Pawar : संघटनेत काम करायची इच्छा व्यक्त केली तर काय चुकलं?
Ajit Pawar News : मी संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली तर काय चुकलं? असा सवाल विरोध पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अजित पवारांनी ‘मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा’, अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली होती.
Video : चोरट्यांचा दिलदारपणा… 20 रुपये घेऊन फिरणाऱ्या दाम्पत्याला दिले खर्चाला पैसे
मला संघटनेतील कोणतंही पद द्या, मी त्या पदाला न्याय देणार असल्याचंही ते म्हणाले होते. अजित पवारांच्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर आता त्यांनी सवाल उपस्थित केला.
अजित पवार म्हणाले, मी मागील 32 वर्षांपासून आमदार, खासदारकी, कॅबिनेट मंत्री, विरोधी पक्षनेते उपमुख्यमंत्री पदे भूषविली आहेत. आता मी संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली तर काय चुकलं असल्याचं ते म्हणाले आहेत.
आलमारीत फक्त सांगडे अन् आव सावकारीचा; फडणवीसांची ठाकरेंवर टीका
तसेच राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मी पक्षश्रेष्ठींपुढे माझी इच्छा व्यक्त केली असून माझं मत मांडलंय. आता पक्षश्रेष्ठींनी त्यावर निर्णय घ्यावा. पक्षाचं पद मिळाल्यानंतर काम करता असं नाही. काम करायचं असेल तर कसंही करता येत असून संघटनेत अनेक नेते आहेत. त्यांनी मला संघटनेतलं कोणतंही पद द्यावं, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
‘भाजप हा विषारी फणा तो ठेचणारच!; राऊतांनी सांगितलं महाविकास आघाडीतलं खरं गुपित
दरम्यान, अजित पवारांच्या इच्छेनंतर राष्ट्रवीदीचे नेते छगन भुजबळांनीही ओबीसी नेत्याकडे पक्षाचं प्रदेशाध्यपद असावं, असं विधान केलं होतं. त्यावरही अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षात असतानाच सर्वांना सोबत घेऊन जायं असेल तर सर्व घटकांना न्याय मिळालाच पाहिजेत, छगन भुजबळ जे बोलले आहेत ते बरोबरच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
अजित पवारांच्या इच्छेनंतर सुप्रिया सुळेंनीही माझ्या भावाच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, हेच बहीण म्हणून मला वाटते, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता अजित पवार यांना खरोखरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एखादी नवी जबाबदारी मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.