Video : चोरट्यांचा दिलदारपणा… 20 रुपये घेऊन फिरणाऱ्या दाम्पत्यालाच दिले खर्चाला पैसे

Video : चोरट्यांचा दिलदारपणा…  20 रुपये घेऊन फिरणाऱ्या दाम्पत्यालाच दिले खर्चाला पैसे

Delhi Robbery Video : चोरी, दरोड्याच्या असंख्य घटना आपण बातम्यांमध्ये ऐकतो. अगदी लोकांच्या घरात काही चोरीसाठी मिळाले नाही तरी ते त्यांना मारून प्रसंगी जीवे मारल्याच्याही घटना आपण पाहिल्या आहेत. मात्र दिल्लीमध्ये एक अजब-गजब चोराचा प्रकार घडला आहे. या चोरट्यांचा दिलदारपणा ऐकून तुम्हालाही वाटेल की, चोरटे असावे तर असे. पण या चोरट्यांनी काय दिलदारपणा दाखवला आहे. जाणून घेऊ… (Kindness of Robbers gives Money to couple who have only 20 rupees)

MS धोनीला कँडी क्रश खेळताना पाहिलं अन् तीन तासात 30 लाख चाहते तुटून पडले…

दिल्लीमध्ये एका दाम्पत्याला दोन चोरांनी लुटण्याचा प्रयत्न केला मात्र या दाम्पत्याकडे 20 रूपयेच मिळाले. त्यामुळे या चोरांनी दयाळूपणा दाखवत या दाम्पत्याला 100 रूपये दिले आणि ते निघून गेले. या घटनेचं फुटेज सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Aani Baani: विनोदाची ‘आणीबाणी’ प्रेक्षकांच्या भेटीला, झळकणार हे कलाकार

या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दारूच्या नशेत असलेले दोन लोक एका दाम्पत्याला बंदुकीचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र यावेळी या चोरांना काळालं की, या दाम्पत्याकडे 20 रूपयेच आहेत. त्यामुळे या चोरांनी दयाळूपणा दाखवत या दाम्पत्याला 100 रूपये दिले आणि ते निघून गेले.

या सीसीटीव्ही फुटेजवरून या चोरट्यांची ओळख पटली आहे. देव वर्मा आणि एका खाजगी कंपनीत काम करणारा हर्ष राजपूत अशी या दोघांची नाव आहेत. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून बंदूक स्कूटर आणि 30 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्या संदर्भात पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube