MS धोनीला कँडी क्रश खेळताना पाहिलं अन् तीन तासात 30 लाख चाहते तुटून पडले…

MS धोनीला कँडी क्रश खेळताना पाहिलं अन् तीन तासात 30 लाख चाहते तुटून पडले…

MS Dhoni Candy Crush : इंडियन क्रीकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा (Mahendra Singh Dhoni)एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये धोनी कँडी क्रश (candy crush)खेळताना दिसत आहे. त्या व्हिडीओमध्ये धोनी विमानातून इकॉनॉमी क्लासमधून (Economy class)प्रवास करत आहे. त्यामध्ये धोनी आपल्या टॅबलेटवर कँडी क्रश खेळत असल्याचा पाहायला मिळाला. त्यानंतर जसजसा हा व्हिडीओ व्हायरल होत गेला तसा सोशल मीडियावर Candy Crush चांगलेच ट्रेंडींगला आले. त्यानंतर धोनीच्या अवघ्या चाहत्यांनी तीन तासात तीस लाखांहून अधिक कँडी क्रश गेमचे अॅप्लिकेशन डाऊनलोड झाले आहेत. (ms-dhoni-candy-crush-viral-video-three-million-app-download-in-three-hours)

Ratnagiri Accident : शिंदे सरकार सरसावलं… नातेवाईकांना पाच लाखांची मदत अन् जखमींचा खर्च

व्हिडीओमध्ये झालं असं की, धोनी विमानात प्रवास करत आहे. त्यावेळी एक एअर होस्टेस चॉकलेटने भरलेला ट्रे घेऊन धोनीकडे आली. हे पाहून धोनी हसायला लागला आणि चॉकलेट घेतो. त्याचवेळी धोनीचा टॅबलेट व्हिडीओमध्ये दिसत आहे.

त्यामध्ये कँडी क्रश गेम चालू असल्याचं दिसत आहे. धोनीकडे एअर होस्टेस येण्यापूर्वी तो कँडी क्रशचा गेम खेळत असल्याचं दिसत आहे. महेंद्रसिंग धोनीला कँडी क्रशचा गेम खेळताना पाहून सोशल मीडियावर कँडी क्रशचीच चर्चा सुरु झाली आहे.

शिंदे आत्महत्या प्रकरण : एकाच हॉटेलमध्ये सापडले माजी नगरसेविका अन् खंडणीबहाद्दर पोलीस अधिकारी

सोशल मीडियावर #Candycrush ट्रेंडींगला असल्याचंही पाहायला मिळालं. त्याचवेळी धोनीला कँडी क्रशचा गेम खेळताना पाहून अवघ्या तीन तासांमध्येच त्याच्या तीस लाखांहून अधिक चाहत्यांनी कँडी क्रशचा गेम डाऊनलोड केला आहे. एवढंच नाही तर गेमिंग कंपनीने कँडी क्रशला ट्रेंडमध्ये आणल्याबद्दल महेंद्रसिंग धोनीचे आभारही मानले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube