Download App

(पोकराअंतर्गत) विहीर पुनर्भरण योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

Govt.Schemes : राज्यातील टंचाईग्रस्त परिस्थिती पाहता शेतकऱ्यांकडे पिकाला संरक्षित सिंचनासाठी अस्तित्वात असलेल्या विहिरीद्वारे पाण्याची उपलब्धता होण्याच्या अनुषंगाने जागतिक बँक(World Bank) अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत(Nanaji Deshmukh Agricultural Sanjeevani Projects) भूजल पुनर्भरण यासाठी विहीर पुनर्भरण हे वैयक्तिक लाभाची योजना राबवली जाते. नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्पामध्ये समाविष्ट केलेल्या गाव समूहातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनविणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.(govt schemes Well Refilling Scheme Nanaji Deshmukh Agricultural Sanjeevani Project)

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चिमटे अन् हशा, शिंदेच्या पॉजवर अजितदादांना जयंत पाटलांचा चिमटा

लाभार्थी निवडीच्या अटी :
प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठी ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेल्या अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यात अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी यांना प्राधान्यक्रमाने निवड करुन लाभ देण्यात येतो.
ज्या विहिरी बंद पडलेल्या आहेत, तसेच ज्यांची पाण्याची पातळी खोल गेलेली आहे. अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ देण्यात येतो.
या घटकाचा इतर कोणत्याही योजनेतून पूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा लाभ देण्यात येत नाही.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चिमटे अन् हशा, शिंदेच्या पॉजवर अजितदादांना जयंत पाटलांचा चिमटा

आवश्यक कागदपत्रे :
7/12 उतारा
8-अ प्रमाणपत्र

विहीर पुनर्भरण योजनेसाठी अनुदान किती?
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विहीर पुनर्भरण घटनासाठी अनुदानाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Nanaji Deshmukh Agricultural Sanjeevani Projects

इच्छुक शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी आणि आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज सादर करावा.
मार्गदर्शक सूचनांमध्ये दिलेल्या तांत्रिक निकषाप्रमाणे साहित्य खरेदी करणे आवश्यक आहे.
काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे व देयके स्वसाक्षांकित करुन ऑनलाईन अनुदान मागणी करावी.
उपविभागीय कृषी अधिकारी यांना ऑनलाईन पूर्व संमती दिल्यानंतर घटकाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी.

योजनेचा अर्ज कुठे करावा :
इच्छुक शेतकऱ्यांनी https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करुन आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.

Tags

follow us