Download App

पांढरे केस कमी करण्यासाठी वापरा मोहरीचे तेल

Hair Care Tips: आजकाल बदलती जीवनशैली, धूळ, प्रदूषण आणि चुकीचे खाणे यामुळे लहान वयातच केस पांढरे होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत लोक त्यांच्या वेळेपूर्वी म्हातारे दिसू लागतात. पांढरे केस कमी करण्यासाठी अनेक महागड्या हेअर प्रोडक्ट्सचाही वापर केला जातो. त्यामुळे केसांवरही दुष्परिणाम होऊ शकतात. नैसर्गिक उपायांचा अवलंब करूनही तुम्ही पांढरे केस कमी करू शकता. चला जाणून घेऊया या प्रभावी उपायांबद्दल…

मोहरीचे तेल आणि कोरफड जेल : या पॅकचा वापर करून केस पांढरे होण्याच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. यासाठी एका छोट्या भांड्यात २-३ चमचे मोहरीचे तेल घ्या, त्यात कोरफड व्हेरा जेल घाला. आता हे मिश्रण केसांना लावा. साधारण ३० मिनिटांनंतर सौम्य शैम्पूने धुवा. हा पॅक तुम्ही आठवड्यातून किमान 2-3 वेळा वापरू शकता.

मोहरीचे तेल, लिंबाचा रस आणि मेथी पावडर : यासाठी मोहरीच्या तेलात लिंबाचा रस, मेथी पावडर टाका. हे मिश्रण चांगले मिसळा. आता हा पॅक केसांना लावा. साधारण अर्ध्या तासानंतर स्वच्छ धुवा.

मोहरीचे तेल आणि दही : हा हेअर मास्क बनवण्यासाठी मोहरीच्या तेलात दही घाला. हे मिश्रण चांगले फेटून घ्या. आता हा पॅक टाळूवर लावा. सुमारे 30-40 मिनिटांनंतर सौम्य शैम्पूने धुवा.

उद्धव ठाकरेंनी घेतली गडाखांची भेट, पाहा फोटो..

मोहरी तेल आणि केळी पॅक : प्रथम पिकलेले केळे एका भांड्यात मॅश करा, आता त्यात मोहरीचे तेल घाला. ही पेस्ट टाळूवर लावा, अर्ध्या तासानंतर केस धुवा.

Tags

follow us