नाश्त्यासाठी बनवा खास हरभरा डाळ वडा

साहित्य : २ वाट्या हरभऱ्याची डाळ तांदळाची पिठी १०-१२ लसूण पाकळ्या ४ हिरव्या मिरच्या अर्धा जुडी कोथिंबीर मीठ, हळद आणि साखर चवीपुरते तळणीसाठी तेल कृती : – रात्री हरभरा डाळ पाण्यात भिजत ठेवावी. ती सकाळी उपसून बारीक वाटावी. – एका भांड्यात तेलाची फोडणी करुन त्यामध्ये मिरच्यांचे तुकडे व हळद घालून वाटलेली डाळ घालावी. त्यामध्ये लसूण […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 21T154302.244

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 21T154302.244

साहित्य :
२ वाट्या हरभऱ्याची डाळ
तांदळाची पिठी
१०-१२ लसूण पाकळ्या
४ हिरव्या मिरच्या
अर्धा जुडी कोथिंबीर
मीठ, हळद आणि साखर चवीपुरते
तळणीसाठी तेल

कृती :
– रात्री हरभरा डाळ पाण्यात भिजत ठेवावी. ती सकाळी उपसून बारीक वाटावी.
– एका भांड्यात तेलाची फोडणी करुन त्यामध्ये मिरच्यांचे तुकडे व हळद घालून वाटलेली डाळ घालावी.
त्यामध्ये लसूण ठेवून टाकावी.
– कोथिंबीर बारीक चिरुन चवीपुरते मीठ व साखर घालावी.
– नंतर थोडासा पाण्याचा हबका मारुन वर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी.
– पुढे भांडे खाली उतरवून ठेवावे. थंड झाल्यावर मिश्रणाचे पेढ्याएवढे चपटे वडे करावेत.
– तांदळाच्या पिठीत कडकडीत तेलाचे मोहन घालावे.
– थोडीशी हळद, लाल तिखट व मीठ घालून अगदी पातळ भिजवावे.
– त्यानंतर या पिठात वडे बुजवून लालसर तळावेत.

Exit mobile version