Download App

सावधान! BMI ओके तरीही होऊ शकतो विविध आजारांचा धोका; दिल्ली AIIMS चा धक्कादायक रिपोर्ट

दिल्लीतील 43 टक्के शाळकरी मुलांमध्ये मेटाबॉलिकली ओबेस नॉर्मली वेट (MONW) समस्या आहे.

Delhi AIIMS Report : साधारणपणे असे समजले जाते की ज्या मुलाचे वजन नियंत्रणात आहे त्याला दुसऱ्या कोणत्याही आजाराचा धोका कमी आहे. पण ही बाब शंभर टक्के खरी नाही. AIIMS दिल्लीच्या सर्वेमध्ये दिसून आले आहे की दिल्लीतील 43 टक्के शाळकरी मुलांमध्ये मेटाबॉलिकली ओबेस नॉर्मली वेट (MONW) समस्या आहे. याचा अर्थ असा की या मुलांमध्ये BMI नियंत्रणात (Body Mass Index)आहे तरी देखील त्यांना मेटाबॉलिक समस्या आहे. या मुलांमध्ये कुणाला ना कुणाला तरी कमीत कमी एक मेटाबॉलीक समस्या आहे.

या रिसर्चमध्ये म्हटले आहे की 43 टक्के शाळकरी मुले अशी आहेत ज्यामध्ये कुणाला ना कुणाला तरी हाय फास्टींग ग्लुकोज, हाय ट्रायग्लिसरॉईड्स आणि शरीरात गुड कोलेस्टेरॉलची कमतरता आहे. जरी या मुलांचा बीएमआय ठीक असला तरी त्यांच्यात या समस्या निर्माण होत आहेत. एम्सने 6 ते 19 वर्षांच्या शहरी शाळकरी मुलांमध्ये दिसलिपीडेमिया, मेटाबॉलिक सिंड्रोम आणि मेटाबॉलिकली ओबेस नॉर्मल वेट सारख्या कार्डिओ मेटाबॉलीक आजारांची तपासणी करण्यासाठी 3888 विद्यार्थ्यांवर अभ्यास करण्यात आला. या एकूण मुलांपैकी 7.37 टक्के विद्यार्थ्यांना हाय बीपी, 13.41 टक्के विद्यार्थ्यांना लठ्ठपणा, 15.02 टक्के विद्यार्थ्यांना हाय ग्लुकोज आणि जवळपास 4 टक्के विद्यार्थ्यांना हायपरइन्सुलिनेमियाची समस्या आढळून आली.

डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय, नवीन नाही जुन्याच गोष्टी.. अमलात आणा अन् राहा कूल

ज्या मुलांचा बीएमआय ठराविक निकषानुसार होता त्या मुलांमध्ये सुद्धा गुड कोलेस्टेरॉलची (Good Cholesterol) कमतरता आणि हाय ट्रायग्लिसराईड्स आढळून आले आहेत.

MONW म्हणजे काय

एम्स मधील बायोस्टॅटिक्स विभागातील असोसिएट प्रोफेसर डॉ. एम. कलेवाणी म्हणतात, ही एक अशी मेडिकल कंडीशन आहे ज्यामध्ये व्यक्तीचा बीएमआय नॉर्मल असतो पण त्याच्या शरीरात कोलेस्टेरॉल, शुगर, ब्लड प्रेशर नॉर्मल रेंजमध्ये नसतात. सामान्यपणे या समस्या लठ्ठ व्यक्तींमध्ये दिसून येतात. पण ज्यांना मेटाबॉलिकली ओबेस नॉर्मल वेट (MONW) असते त्यांचे शरीर सडपातळ किंवा फिट दिसत असले तरी या समस्या निर्माण होऊ शकतात.

रिसर्चमध्ये दिसून आले आहे की दिल्लीतील जवळपास 43 टक्के विद्यार्थी मेटाबॉलिकली ओबेस नॉर्मल वेट असणारे आहेत. या मुलांना भविष्यात हृदयविकार किंवा अन्य मेटाबॉलिक आजार होण्याचा धोका जास्त असतो. फक्त बीएमआय चांगला असला म्हणजे व्यक्ती तंदुरुस्त आहे असे नसते. यासोबतच ब्लड टेस्ट आणि ब्लड प्रेशर व्यवस्थित असावे लागते. त्यामुळे या तपासण्या वेळोवेळी करत राहा. जेणेकरून भविष्यातील संभाव्य आरोग्य समस्यांपासून तुम्ही दूर राहू शकाल.

तुमच्याही बाळाला मोबाईलचं व्यसन लागलंय? फोनची सवय सोडण्यासाठी ‘हे’ 5 मार्ग नक्की वापरा

follow us