Download App

उन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याचे हे फायदे एकदा नक्की वाचाच

Coconut Water : मार्च संपला व एप्रिल महिना सुरु झाला आहे. उन्हाळा म्हंटल की अंगाची लाहीलाही होणार हे नक्की. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे असते. यासाठी वारंवार पाणी पिणे हे महत्वाचे असते. तसेच शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवणे हे देखील महत्वाचे असते. दरम्यान उन्हाळ्याच्या काळात उष्माघाताचा फटका हा आरोग्यावर होत आहे. त्यामुळे याकाळात नारळ पाणी पिणे हे आरोग्यदायी ठरू शकते. शरीराला पोषक जीवनसत्त्वे आणि खनिजे याद्वारे मिळत असतात. यामुळे नारळपाणी हे या काळात शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरणारे फळ ठरते.

पौष्टिक घटकांनी परिपूर्ण
आजारी असल्यास संबंधित पेशंटला नारळपाणी दिले जाते हे आपण आजवर पहिलेच असेल. म्हणजेच नारळपाण्यात अनेक पौष्टिक घटक असतात. नारळाच्या पाण्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि सोडियम यासारखे घटक असतात. शरीर पूर्णपणे हायड्रेट ठेवण्यास नारळ पाणी मदत करते. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत होते.

हाय बीपी कंट्रोलमध्ये ठेवते
आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे उच्च रक्तदाबाची समस्यां निर्माण झाली आहे. मात्र हाय बीपी समस्यांमध्ये नारळपाणी हे फायद्याचे ठरते. नारळ पाण्यातील पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवते. पोटॅशियम, क्लोराईड आणि सायट्रेट असल्याने नारळ पाण्याचे सेवन केल्याने स्टोन क्रिस्टल्स कमी होण्यास मदत होते.

आत्महत्या रोखण्यासाठी मंत्रालयातील संरक्षक जाळी बनली आणखी घट्ट

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
फास्टफूड, तेलकट, मसालेदार पदार्थांमुळे वजन वाढण्याची समस्या अनेकांना भेडसावत असते. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तरीसुद्धा नारळ पाणी तुमच्यासाठी फायदेशीर ठरते. नारळ पाण्याच्या सेवनाने शरीरातील साखर नियंत्रणात राहते. ज्यामुळे मधुमेहाची समस्या टाळता येते.

बिग बॉस फेम प्रियांका चौधरीचा ग्लॅमर्स अंदाज

त्वचेसाठी फायदेशीर
उन्हाळ्यात उष्णतेमुळे आलेला थकवा नारळ पाणी प्यायल्याने दूर होतो. तसेच रोगप्रतिकारशक्ती देखील वाढण्यास मदत होते. नारळाचे पाणी आरोग्यासोबत त्वचेसाठीही चांगले असते. नारळाचे पाणी जर तुम्ही ते तुमच्या चेहऱ्यावरील मुरुम देखील दूर करू शकते.

Tags

follow us