आत्महत्या रोखण्यासाठी मंत्रालयातील संरक्षक जाळी बनली आणखी घट्ट

आत्महत्या रोखण्यासाठी मंत्रालयातील संरक्षक जाळी बनली आणखी घट्ट

Mantralaya Security Net : महत्वाच्या कामांसाठी अनेकजण मंत्रालयात जात असतात मात्र अनेकदा काम न होणे, किंवा यामध्ये अडचणी येणे यामुळे व्यथित झालेले थेट टोकाचा निर्णय घेतात. यामुळे अनेकदा मंत्रालयात आत्महत्यांच्या घटना घडल्या आहेत. आता याच पार्श्वभूमीवर सरकारकडे दाद मागण्यासाठी येणाऱ्यांना मंत्रालयात आत्महत्या करणे किंवा तसा प्रयत्न करण्यापासून रोखण्यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे. मंत्रालयातील संरक्षण जाळी आता आणखी मजबूत व घट्ट बनवण्यात आली आहे.

मंत्रालयात न्याय मिळत नाही म्हणून दोन महिलांनी विष प्राशन केल्याची घटना घडली होती. यात धुळ्यातील एका महिलेचा मृत्यू झाला. या दोन्ही महिलांनी थेट मंत्रालयाच्या मुख्यप्रवेशद्वारावर विष प्राशन केल होत. या घटनेच्या दोन महिन्यापूर्वी एका व्यक्तीने थेट सहाव्या मजल्यावरून जाळीवर उडी मारली होती. दरम्यान सतत अशा घटना वाढल्याने मंत्रालयातली सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. आता टपालसाठी मंत्रालयात यावे लागणार नाही. त्याच प्रमाणे सुरक्षा म्हणून मंत्रालयातील सुरक्षा जाळी देखील अधिक घट्ट आणि ताणण्यात आली आहे.

२०१४ मध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारला होता. काही दिवस होत नाही तोच एका व्यक्तीने तिसऱ्या मजल्यावरून आत्महत्या केली होती. त्यावेळी मंत्रालयात नायलॉनची सुरक्षा जाळी बसवण्यात आली होती. पुढच्या पाच वर्षापर्यंत कठड्यावर बसण्यास मज्जाव केला जात होता.

नागरिकांनो सावधान ! राज्यावर पुन्हा अवकाळीचे ढग… ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता

आता पुन्हा ही जाळी चर्चेत आली आहे. गेल्या आठ वर्षात ही जाळी बरीच सैल झाली होती. मध्यभागी वजनाने लोंबकळत होती. या दोन जाळ्या एकमेकांवर लावण्यात आल्या आहेत. आता त्यांना अधिक घट्ट करण्यात आले आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करुन ही जाळी पुन्हा घट्ट केली आहे.

दुर्दैवी घटना! ड्युटीवर निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूने गाठले

जाळी ओढली गेल्याने ती स्प्रिंग सारखी झाली आहे. एकमेकावर जाळी आणली गेल्यामुळे खाचेच अंतर देखील कमी झाल आहे. असे अपघात पुन्हा घडू नये म्हणून प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त केला आहे. मात्र लोकांवर ही वेळ येऊ नये असा गतिमान कारभार झाला तर अशा जाळ्यांची आवश्यकता उरणार नाही हे मात्र खर.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube