नागरिकांनो सावधान ! राज्यावर पुन्हा अवकाळीचे ढग… ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता
Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी देखील देखील कोसळल्या आहे. आता पुन्हा एकदा हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. येणाऱ्या काही तासांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाच्या वतीने देण्यात आले आहे.
या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गडगडाटी वादळासह विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच याकाळात 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहू शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान एप्रिल महिना सुरु झाला आहे. तापमानाचा पारा वाढणार त्याआधीच राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. यामुळे उन्हाचा तडाख्यापुर्वीच पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना देखील घडल्या आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहू लागल्याने झाडे, विजेची पोल, विद्युत तारा या कोसळल्या असल्याच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी घरांची पडझड देखील झाली यामुळे आर्थिक नुकसान देखील झाले आहे.
सतेज पाटील हे 96 कुळी पाटील नव्हे तर मनोरुग्ण पाटील… महाडिकांची टीका
हवामान विभागाने दिलेल्या नवीन अंदाजानुसार आता पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी आज सकाळ पासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पावसाची दाट शक्यता दिसून येत आहे. यातच कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने नोंदवला आहे.