सतेज पाटील हे 96 कुळी पाटील नव्हे तर मनोरुग्ण पाटील… महाडिकांची टीका

सतेज पाटील हे 96 कुळी पाटील नव्हे तर मनोरुग्ण पाटील… महाडिकांची टीका

Dhananjay Mahadik Attack Satej Patil : राजाराम सहकारी कारखाना निवडणुकीवरून आमदार सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यामध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु आहे. नुकतेच पाटील यांच्या गटातील 27 उमेदवारांना अपात्र ठरवण्यात आलं होते. त्यानंतर पाटील यांनी महाडिकांवर हल्लाबोल केला होता. आता त्यांना प्रत्युत्तर देताना धनंजय महाडिक म्हणाले सतेज पाटील हे सगळीकडे सांगतायत मी 96 कुळी पाटील आहे. सर्वजण 96 कुळी पाटील आहेत. पण, ते मनोरुग्ण पाटील आहेत. अशा शब्दात महाडिक यांनी थेट सतेज पाटील यांना शाब्दिक टोला लगावला आहे.

खासदार धनंजय महाडिक राजाराम कारखान्याच्या प्रचार शुभारंभात बोलत होते. या मेळाव्यात बोलत असताना महाडिक म्हणाले की, बंटी पाटील यांचा साधा टनभर ऊस हा कारखान्याला जात नाही. आणि सारखं सारखं सांगतो मी पाटील आहे, पाटील आहे. सतेज पाटील हा मनोरुग्ण व्यक्ती आहे, खोटारडा माणूस आहे. सूडबुद्धीने काम करणारा हा महाराष्ट्रातील एकमेव नेता राहिला आहे. सतेज पाटील तुमचे सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत होतील. अशा कडव्या शब्दात महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, बंटी पाटील कोल्हापुरला लागलेला शाप आहे. 15 वर्षे आमदार, 8 ते 9 वर्षे मंत्री होते. त्यांनी कोल्हापुरचा काय विकास केला? सतेज पाटील कोल्हापुरला लागलेला शाप नाहीतर शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळही आहेत,” अशी घणाघाती टीका महाडिक यांनी केली. दरम्यान ही निवडणूक एकतर्फी होत, बंटी पाटलांच्या सर्व उमेदवारांची डिपॉझिट रक्कम जप्त होणार, असा दावा यावेळी महाडिक यांनी केला आहे.

मी माघार घेतली म्हणून तुम्ही आमदार झाला…
यावेळी बोलताना माजी आमदार अमल महाडिक म्हणाले, महादेवराव महाडिक यांनी 27 वर्षे हा कारखाना सभासदांचा ठेवला. कारखान्याचा 7/12 छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखानाच्या नावाने आहे. मात्र बंटी पाटलांनी कोणाचे तरी ऐकून तोंडावर पडू नये.

Radhakrishna Vikhe Patil : बाबासाहेब कोणत्‍या एका विशिष्‍ट समाजाचे नेते नव्‍हते तर…

आम्ही 37 वर्षाचा अहवाल तुम्हाला दाखवतो, तुम्ही एक वर्षाचा दाखवा. तुमची भाषा मग्रुरीची असून, खोटारडेपणा हे तुमचं सूत्र आहे. आपण हे विसरू नये की तुम्हाला महादेवराव महाडिकांनी प्रथम आमदार केलं होतं. विधानपरिषदेला मी माघार घेतली म्हणून तुम्ही आमदार झाला. असं टीकास्र अमल महाडिक यांनी सोडलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube