दुर्दैवी घटना! ड्युटीवर निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूने गाठले

दुर्दैवी घटना! ड्युटीवर निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूने गाठले

Police Officer Dies Accident : ड्युटीवर जात असताना बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना मुंबईमध्ये घडली आहे. विशेष म्हणजे मुंबईत नियुक्तीस असलेले हे पोलीस अधिकारी हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. प्रवीण दिनकर असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून त्यांच्या निधनाने पोलीस दलातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पोलीस अधिकारी प्रवीण दिनकर हे सकाळी घरातून निघून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे ड्युटीवर जाण्यासाठी निघाले होते. रस्त्यानं जात असताना मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर एका बसने दिनकर यांच्या दुचाकीला धडक दिली. बसने दिलेल्या धडकेने दुचाकीवरून खाली पडून रस्त्यावर कोसळले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.

सतेज पाटील हे 96 कुळी पाटील नव्हे तर मनोरुग्ण पाटील… महाडिकांची टीका

दिनकर यांना तातडीने महापालिकेच्या सांताक्रुज येथील व्ही एन देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी दिनकर यांना मृत घोषित केले. पोलीस अधिकारी प्रवीण दिनकर यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

नागरिकांनो सावधान ! राज्यावर पुन्हा अवकाळीचे ढग… ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता

मूळचे नगरचे रहिवासी
मुंबईत नियुक्तीस असलेले प्रवीण दिनकर हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील आहे. त्यांच्या दुर्दैवी निधनाने त्यांच्या पत्नी व मुलांवरील छतच हरपले आहे. प्रवीण दिनकर यांच्या पाठीमागे आई, वडील, भाऊ, पत्नी, व दोन मुली असा परिवार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube