Download App

TANAJI SAWANT : आरोग्य यंत्रणा कोरोनाशी लढण्यास सक्षम; खबरदारी म्हणून मास्क वापरावे

  • Written By: Last Updated:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोना(Corona) रुग्णसंख्येत राष्ट्रीय पातळीवर मोठ्या संख्येने वाढ झाली. जगभर कोरोनानं पुन्हा आपलं डोकं वर काढायला सुरूवात केला आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली असून आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून वेळोवेळी नागरिकांना सर्तक राहण्याच्या सुचना दिल्या जात आहेत. दरम्यान, साताऱ्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क सक्तीचा निर्णय घेतला. मात्र, कोरोनाचा नवा व्हेरियंट फारसा घातक नसल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी सांगितलं.

तानाजी सावंत यांनी सांगितले की, कोरोनाचा नवा व्हेरियंट हा फारसा घातक नाही. या नव्या व्हेरियंटमुळं फारसा त्रास होत नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारणं नाही. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. आपण सगळी तयारी करून आहोत. आपले सगळे रुग्णालय हे बेडसह तयार आहेत. मात्र, त्याठिकाणी सद्य स्थितीत एकही पेशंट नाही. आता चैत्र महिना चालू आहे. मुलांना शाळांना सुट्या लागतील. पर्यटनस्थळी गर्दी राहील. त्यामुळं आपण खबरदारी घेणं गरजेचं आहे. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, आणि गर्दीच्या ठिकाणी गेलाच तर मास्क घालावं, असं त्यांनी सांगितलं.

रिक्षावाला विधानावरून, अरविंद सावंतांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन 

ते म्हणाले, राज्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळं चिंता करण्याची आणि पॅनिक होण्याची गरज नाही. ताप, खोकला, डोकंदुखी काहीही असेल तर अंगावर काढू नका. तुम्हाला कोणताही त्रास जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि गर्दीमध्ये जाण्यापासून स्वत: टाळा, असं आव्हान त्यांनी केलं.

सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सिंधूदुर्ग या सहा जिल्ह्यांत हा विषाणू वाढतो आहे. मात्र, तिथं एकही पेशंट व्हेंटिलेटवर नाही. त्यामुळं घाबरून जाण्याची गरज नाही. आरोग्य मंत्रालय हे सर्व रुग्णालयांच्या संपर्कात आहे. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने कुठल्याही प्रकारची मास्क सक्ती केली नाही. मात्र, आपल्याला धोका पत्करायचा नाही, त्यामुळं आपण खरबदारी म्हणून मास्क वापरावे, असं त्यांनी सांगितलं आहे.

 

follow us