रिक्षावाला विधानावरून, अरविंद सावंतांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन
बीड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी बीडमध्ये शिंदे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या फोटोला जोडे मारून दहन करण्यात आले.
दरम्यान यावेळी अरविंद सावंत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सावंत यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही. तसेच त्यांक्या गाड्यांचा ताफा फोडू असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिला.
खासदार सावंत म्हणाले होते , “महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या वेळी शरद पवार म्हणाले होते की, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतमध्ये मुखमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहिलेले नेते आहेत. तर ते या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? याच्या हाताखाली तुम्ही काम करणार का? तरीही उद्धव ठाकरेंनी नाव दिलं होतं. नाही, मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेच होतील. पण त्यानंतर शरद पवारांनी गळ घातली. उद्धव ठाकरे हे शिवधनुष्य तुम्हालाच घ्यावं लागेल. आपण काय रणांगणातून पळणारे नाही ना. मग उद्धवजींनी शरद पवारांचा शब्द स्वीकारला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.”