How To Earn Money From Snapchat : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम आणि फेसबुक अनेक लोकांसाठी उत्पन्नाचे साधन बनत आहेत. कंटेंट क्रिएटर्स इंस्टाग्राम (Instagram) आणि फेसबुकवर (Facebook) धुमाकूळ घालत आहेत. एवढेच नाही तर आजकाल मुले स्नॅपचॅटवर (Snapchat) स्नॅप-स्नॅप खूप खेळत आहेत. परंतु केवळ टाईमपास न करता तुम्ही इन्स्टाग्राम आणि फेसबुक सारख्या स्नॅपचॅटवरून पैसे कमवू शकता. या प्लॅटफॉर्मवरून (Social Media) दररोज हजारो रुपये कमवता येतात. पण यावर पैसे कमवणे थोडे कठीण आहे. स्नॅपचाटवरून पैसे कसे कमवायचे? यासंदर्भात सविस्तर जाणून घेऊ या.
स्नॅपचॅटवरून पैसे कसे कमवायचे?
स्नॅपचॅटवर स्नॅप्स वापरकर्त्यांना सर्वात जास्त आकर्षित करतात. यामध्ये फोटो किंवा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवू शकता. स्नॅप्स फक्त काही सेकंदांसाठी उपलब्ध असतात आणि नंतर आपोआप गायब होतात. जेव्हा तुम्ही स्नॅप तयार करता तेव्हा ते अधिक आकर्षक बनवण्यासाठी फिल्टर, स्टिकर्स आणि मजकूर देखील त्यात अॅड करू शकतो. पण खरी कमाई स्पॉटलाइट फीचरमधून होते.
जर तुम्ही स्पॉटलाइटवर एक अनोखा आणि आकर्षक स्नॅप अपलोड केला. जर इतर वापरकर्त्यांना तो आवडला तर तुम्हाला क्रिस्टल्स अवॉर्ड्स मिळू शकतात. हे क्रिस्टल्स प्रत्यक्षात आभासी बक्षिसे आहेत, ती तुम्ही नंतर पैशात रूपांतरित करू शकता. तुमची कमाई तुमच्या कंटेंटला किती व्ह्यूज, लाईक्स मिळत आहेत? तुम्ही इतरांच्या तुलनेत किती चांगले काम करता? यावर अवलंबून असते.
कोण कमावण्यास पात्र आहे?
पैसे कमविण्यासाठी तुमचा स्नॅप स्पॉटलाइटमध्ये असला पाहिजे. जर तुमचा स्नॅप स्पॉटलाइटवर गेला आणि दर्जेदार कंटेंटमध्ये समाविष्ट झाला, तर तुम्हाला माय प्रोफाइलमध्ये एक सूचना मिळेल. तिथून तुम्ही My Snap Crystals पर्यायाद्वारे Crystal Hub उघडू शकता.
सातासमुद्रापार मराठीचा डंका! ‘या’ चार मराठी चित्रपटांची कान्स महोत्सवाच्या चित्रपट बाजारासाठी निवड
परंतु जर तुम्ही स्नॅप डिलीट केला तर तुमची पात्रता संपेल, तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तसेच, स्नॅपचॅटच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वे आणि सेवा अटींचे पालन करणे अनिवार्य आहे. अपलोड केल्यानंतर 28 दिवसांपर्यंत स्नॅप लाईव्ह राहतो, तोपर्यंत तुम्ही स्नॅपसाठी अनेक वेळा रिवॉर्ड मिळवू शकता.