Nachani Satva Drink : नाचणी हे धान्य गुणांनी थंड समजले जाते, तसेच त्यात लोहाचे प्रमाणही चांगले आहे. (Drink) उन्हाळ्यात आपल्याला काहीतरी थंड पेय प्यावेसे वाटते. अशा वेळी पौष्टिक असे ‘नाचणी सत्त्व ड्रिंक’ प्यायल्यास नक्की ताजेतवाने वाटेल.
साहित्य
५ टेबलस्पून नाचणीचे सत्त्व
मध्यम आकाराचा पाऊण ग्लास दूध
२ ग्लास पाणी
४-५ चमचे साखर
आला उन्हाळा प्रकृती सांभाळा! उन्हाळ्यात उष्णतेमुळे होणारे आजार टाळण्यासाठी खा हे सुपरफुड!
कृती
५ टेबलस्पून नाचणी सत्त्व एका भांड्यात घ्या. (बाजारात नाचणी सत्त्व साखर व वेलचीयुक्त किंवा साखरविरहित या दोन प्रकारांत मिळते. या ड्रिंकसाठी शक्यतो साखर-वेलचीयुक्त नाचणी सत्त्व वापरा.) नाचणी सत्त्वात पाऊण ग्लास दूध घाला आणि चमच्याने ढवळत सर्व गुठळ्या फोडून नाचणी सत्त्व दुधात मिसळून घ्या. या मिश्रणात २ ग्लास पाणी घाला आणि ४-५ चमचे साखर घाला. (नाचणी सत्त्व साखर क वेलचीयुक्त घेतले. तरी त्याची गोडी कमी असते. तुमच्या चवीनुसार साखर कमी करत येईल.) नाचणी सत्त्वाचे मिश्रण मंद आचेवर गरम होण्यासाठी ठेवा. अधूनमधून ढवळ मिश्रणाच्या गुठळ्या न होऊ देणे व ते भांड्याच्या तळाशी लागू न देणे आवश्यक. मिश्रणाला एक उकळी येऊ द्या व पुन्हा ढवळा. दूसरी उकळी आली. की गॅस बंद कर व नाचणी ड्रिंक गार होऊ द्या. पूर्ण गार झाल्यावर ग्लासमध्ये ओतून प्यायला द्या.
काय काळजी घ्यावी?
नाचणी सत्त्वाचे मिश्रण एकत्र करणे व त्यातील गुठळ्या चमच्याने फोडणे तुम्हाला नक्की जमेल. मात्र मिश्रण गरम करण्यासाठी मोठ्या माणसांची मदत घ्या.
प्रयोग करा
केवळ दूध घालून खिरीसारखे घट्टसर नाचणी सत्त्व करता येते. दूध-साखर-वेलची यांपैकी काहीही न घालता केवळ पाण्यात व चवीपुरते मीठ घालूनही नाचणी सत्त्व शिजवता येते. असे केल्यास गार झाल्यावर त्यात ताक घालून पितात.