Download App

देशात पसरतोय आय फ्लू; तज्ज्ञांनी दिला सल्ला, अशी घ्या काळजी

Eye Flu : सध्या देशभरामध्ये एका आजाराचा संसर्ग वाढला आहे. देशात आय फ्लू पसरतोय. तर जुलै महिन्यात या संसर्गाच्या सर्वाधिक रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी दिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. अनेक कुटुंबांमध्ये या संसर्गाचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या संसर्गामध्ये काळजी कसी घ्यायची याबद्दल जाणून घेऊ… ( How to take care of Eye Flu )

‘राष्ट्रवादीने काय गद्दारी केली म्हणून तुम्ही फोडाफोडी केली?’ उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

आय फ्लूची कारणं :
डोळे येणे किंवा आता आलेला आय फ्लू हा आजार पावसाळ्यात बळावतो. त्यामुळे पावसाळ्यात डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळे पावसाळा आणि त्यात हवामानात सारखा राहणारा ओलावा हा आय फ्लू होण्याचं मोठं कारण आहे. कारण हवेतील ओलाव्यामुळे हवेतील जंतू सहज रिप्लीकेट होतात.

ASI सर्वेक्षण म्हणजे काय? जाणून घेऊया…

आय फ्लूपासून असा बचाव करा :
त्यामुळे सध्या पावसाळा सुरू आहे. दरम्यान देशात आय फ्लू झापाट्याने वाढत आहे. त्यामुळे हा आजार झाल्यावर उपचार करत बसण्यापेक्षा हा आजार होऊ नये यासाठी अगोदर काळजी घेणे गरजेचे आहे. या आजारापासून वाचण्यासाठी हायजीन जपा, अंघोळीची टॉवेल आणि कपडे एकमेकांचे वापरू नका. ज्यांना संसर्ग झालाय त्यांच्या पासून दूर राहा त्या लोकांनी शाळा, कॉलेज आणि ऑफिसला येऊ नये. जोपर्यंत फ्लू बरा होत नाही.

आय फ्लू झाल्यास अशी घ्या काळजी :
जर तुम्हाला आय फ्लू झाला तर दिवसातून दोन वेळा डोळे पाण्याने स्वच्छ करा. डॉक्टरांनी दिलेले ड्रॉप वेळच्यावेळी टाका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध किंवा इलाज करू नका. त्यामुले डोळ्यांच्या समस्या आणखी वाढू शकतात. त्यामुळे डोळे बरे होण्याऐवजी दुसऱ्या समस्या निर्माण झाल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी या आजाराचा फैलाव जास्त झाला आहे. तर तर जुलै महिन्यात या संसर्गाच्या सर्वाधिक रूग्णांची नोंद झाली आहे. हा एक संसर्गजन्य आजार आहे. तो आपोआप बारा होतो. तर एका मुळे संपूर्ण कुटुंबाला संसर्ग होऊ शकतो. हा आजार बरा होण्यास 3-5 दिवस लागतात. एका नंतर दुसऱ्या डोळ्यालाही होऊ शकते. त्यामुळे हा आजार झाल्यावर उपचार करत बसण्यापेक्षा हा आजार होऊ नये यासाठी अगोदर काळजी घेणे गरजेचे आहे.

Tags

follow us