मोबाईल काढला, स्कॅन केलं अन् पैसे ट्रान्सफर; जाणून घ्या, UPI नक्की कसं काम करतं?

How UPI Worked भाऊ, UPI करा! खिशात पाकीट नसलं तरी चालतं, पण मोबाईल हवाच. पण...

मोबाईल काढला, स्कॅन केलं अन् पैसे ट्रान्सफर; जाणून घ्या, UPI नक्की कसं काम करतं?

मोबाईल काढला, स्कॅन केलं अन् पैसे ट्रान्सफर; जाणून घ्या, UPI नक्की कसं काम करतं?

How UPI Worked In Backend : आज चहाच्या टपरीपासून ते मोठ्या शोरूमपर्यंत सगळीकडे एकच वाक्य ऐकायला मिळतं – “भाऊ, UPI करा!” खिशात पाकीट नसलं तरी चालतं, पण मोबाईल हवाच. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, फक्त एक QR कोड स्कॅन केल्यावर तुमच्या बँक खात्यातून पैसे समोरच्या व्यक्तीच्या खात्यात सेकंदात कसे पोहोचतात? UPI नक्की कसं काम करतं? त्याबद्दल सोप्या शब्दांत जाणून घेऊया…

UPI म्हणजे नक्की काय?

UPI म्हणजे ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’ भारताच्या या डिजिटल क्रांतीची निर्मिती NPCI म्हणजेच National Payments Corporation of India या संस्थेने केली आहे. पूर्वी कोणाला पैसे पाठवायचे असतील तर, त्याचा खाते क्रमांक, IFSC कोड टाकावा लागायचा आणि लाभार्थी ॲड होईपर्यंत वाट पाहावी लागायची. आता मात्र फक्त मोबाईल नंबर किंवा QR कोडने काम होतं.

पैसे ट्रान्सफरची ‘सुपरफास्ट’ प्रक्रिया

UPI हे IMPS म्हणजेच Immediate Payment Service तंत्रज्ञानावर चालते. ज्यात तुम्ही QR कोड स्कॅन करताच तुमचे ॲप बँकेशी संपर्क साधते. NPCI कडे हा व्यवहार जातो, जे तो योग्य बँकेकडे वळवते. त्यानंतर तुमची बँक पैसे कापते आणि समोरच्या व्यक्तीच्या बँकेला माहिती देते. दोन्ही बँकांकडून खात्री पटली की व्यवहार पूर्ण होतो. विशेष म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया अवघ्या काही सेकंदात पार पडते आहे की नाही कमाल.

VPA तुमची डिजिटल ओळख

UPI मध्ये तुमच्या बँक खात्याची माहिती गुप्त राहते. त्याऐवजी वापरला जातो तो VPA म्हणजेच Virtual Payment Address होय. जसे की तुमचे_नाव@oksbi. हा तुमचा डिजिटल पत्ता आहे, जो सुरक्षितपणे पैसे देवाणघेवाण करण्यास मदत करतो. पण याहून पुढचं पाऊलं म्हणजे आता UPI फक्त पैसे पाठवण्यासाठी उरलेलं नाही. ICD म्हणजे Interoperable Cash Deposit या नवीन सुविधेमुळे तुम्ही आता डेबिट कार्डशिवाय ATM मध्ये पैसे जमा करू शकता. यासाठी ATM वर जाऊन ‘Cash Deposit’ निवडा. स्क्रीनवर दिसणारा QR कोड स्कॅन करा. मशीनमध्ये पैसे टाका आणि तुमच्या खात्यात ते जमा होतील.

UPI वरील व्यवहार जरी काही सेकंदात मिनिटात पूर्ण होत असले तरी, फ्रॉडचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. यात पैसे मिळवण्यासाठी कधीही PIN टाकावा लागत नाही. कोणी पिन टाकायला सांगितला तर समजून जा तो फसवणूक करत आहे. स्कॅन केल्यावर समोरच्या व्यक्तीचे नाव नक्की तपासा. स्क्रीन शेअरिंग ॲप्स वापरताना काळजी घ्या. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेहमी अधिकृत बँकिंग ॲप्सच वापरा.

Exit mobile version