शरीर सुखासाठी गेला अन् पासवर्ड विसरला; बुधवार पेठेत गेलेला तरूण जेव्हा चोपून निघतो

'पैसा नही तो इधर कायकु आया' असे ती जोरात ओरडली. त्यानंतर तमन्नाच्या मदतीला तनुजा आणि सोनिया या दोघी आल्या.

  • Written By: Published:
शरीर सुखासाठी गेला अन् अन् पासवर्ड विसरला; बुधवार पेठेत गेलेला तरूण जेव्हा चोपून निघतो

Young Man Assaulted By Budhwar Peth 3 Women After Forgetting Payment App Password : पुण्यात घडलं आणि जगभर पसरलं असं नेहमी ऐकलं जातं. अशाच एका घडलेल्या घटनेची जगभर नाही पण, बुधवार पेठेत (Budhwar Peth) घडलेल्या घटनेची सध्या शहरभर जोरदार चर्चा सुरू आहे. नेमकं असं काय घडलं की शरीर सुखासाठी बुधवार पेठेत गेलेल्या तरूणाला सुख नाही पण, मार खाऊन बाहेर पडावं लागलं.

पुण्यातील धक्कादायक प्रकार समोर; पैसे द्या नाहीतर बुधवार पेठेत जाता म्हणून बदनामी करू, दोघांना अटक

शरीरसुखासाठी गेला अन् पेमेंट करताना पासवर्ड विसरला

त्याचे झाले असे की, पुण्यातील बुधवार पेठेत शुक्रवारी (दि.12) रात्री लालबत्ती भागात एक 39 वर्षीय व्यक्ती वेश्यागमनासाठी गेली होती. संबंधित व्यक्ती एका इमारतीतही गेली तेथे तमन्ना शाहरुख मुलाना हिच्याशी व्यवहार ठरला पण, ठरलेली रक्कम ऑनलाईन पेमेंट करताना हे महाशय पासवर्ड (App Password) विसरले. त्यामुळे मुलाना हिच्या खात्यावर रक्कम जमा होऊ शकली नाही आणि इथेच खटका उडाला अन् वादाला तोंड फुटलं. Young Man Assaulted By Budhwar Peth 3 Women After Forgetting Payment App Password

‘पैसा नही तो इधर कायकु आया’

पैसे न मिळाल्याने तम्मनाचा संताप अनावर झाला होता. ‘पैसा नही तो इधर कायकु आया’ असे ती जोरात ओरडली. त्यानंतर तमन्नाच्या मदतीला तनुजा हकीमअली मौल्ला (वय ३४) आणि सोनिया गुलाम शेख (वय ३२, रा. बुधवार पेठ) या दोघी आल्या. त्यानंतर या तिघींनी मिळून वेश्यागमनासाठी आलेल्या पण पासवर्ड विसरलेल्या व्यक्तीला चांगलाच चोपला.

Google Pay Phone Pay वर वारंवार बॅलन्स चेक करताय? मग, आधी हा नवा नियम लक्षात ठेवाच!

जखमी तरूणाची पोलिसा धाव

घडलेल्या घटनेनंतर संबंधित तरूणाने कशी-बशी पोलीस चौकीत धाव घेतली घडलेल्या सर्व प्रसंग सांगितला. त्यानंतर मारहाण करणाऱ्या तिघींविरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. पण, घडलेल्या या घटनेची सध्या सर्वदूर जोरदार चर्चा सुरू आहे.

follow us