Hyundai Alcazar Facelift : देशातील लोकप्रिय ऑटो कंपनी Hyundai Motor India भारतीय बाजारात पुढील महिन्यात मोठा धमाका करणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 9 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारात Hyundai आपली नवीन फेसलिफ्ट कार Hyundai Alcazar Facelift लाँच करणार आहे. माहितीनुसार, ही थ्री रो एसयूव्ही कार Hyundai Creta वर आधारित असणार आहे. या कारमध्ये ग्राहकांना बोल्ड लूक, भानन्ट फीचर्स आणि बेस्ट इंजिन देण्यात येणार असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे.
Hyundai Alcazar Facelift डिझाइन
Hyundai Alcazar Facelift मध्ये रिअर स्पाय शॉट्स नवीन क्रेटा प्रमाणेच अपडेटेड असणार आहे. तसेच नवीन सिग्नेचर LED DRL डिझाइनसह अपडेटेड ग्रिल आणि फ्रंट बंपर देखील या एसयूव्ही कारमध्ये दिसण्याची शक्यता आहे. रियर प्रोफाइलमध्ये नवीन एलईडी टेललाइट्स आणि टेलगेट तसेच बंपरसह बदल दिसू शकतात. Hyundai Alcazar Facelift नवीन लूक देण्यासाठी कंपनीकडून नवीन अलॉय व्हील वगळता प्रोफाइलमध्ये किरकोळ बदल करण्यात येणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
Hyundai Alcazar Facelift फीचर्स
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या कारमध्ये भन्नाट फीचर्स कंपनीकडून देण्यात येणार आहे. माहितीनुसार, या कारमध्ये पॅनोरामिक सनरूफ वेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस चार्जिंग, इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट सारखे फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. तसेच ग्राहकांना डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोलसाठी दोन 10.25-इंच स्क्रीन आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळू शकते. सेफ्टीसाठी या कारमध्ये लेव्हल 2 ADAS चा समावेश असणार आहे.
धक्कादायक, पुण्यात बदलापूर पार्ट 2, शाळेतच अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न
Hyundai Alcazar Facelift इंजिन
Hyundai Alcazar Facelift पेट्रोल आणि डिझेल मॉडेलमध्ये लाँच होणार आहे. सध्याच्या मॉडेलमध्ये 1.5-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे 158 bhp आणि 253 Nm निर्मिती करते तर 1.5-लीटर डिझेल इंजिन 114 bhp आणि 250 Nm निर्मिती करते. पेट्रोल मोटर 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड DCT सह जोडलेली आहे, तर डिझेल 6-स्पीड मॅन्युअल आणि टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिकसह उपलब्ध आहे.