Download App

नौदलात अधिकारी व्हायचं? मग आत्ताच करा अर्ज, ‘या’ पदांच्या 224  जागांसाठी भरती सुरू

  • Written By: Last Updated:

Indian Navy Recruitment 2023: देशभरातील अनेक तरुणांना भारतीय नौदलात नोकरी करायची इच्छा असते.  लाखो विद्यार्थी यासाठी तयारी करत असतात.  नौदलात नोकरी (job) करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी  एक गुड न्यूज आहे. भारतीय नौदलात नोकरीची चांगली संधी उपलब्ध आहे. ती म्हणजे,  भारतीय नौदल शॉर्ट सर्व्हिस कमिशनने (SSC Officer) अधिकारी पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे.

Virat Kohli: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात विराटने घातली भलतीच जर्सी, नेमकं काय घडलं? 

या भरती अंतर्गत एकूण 224 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर 2023 आहे. इंडियन नेव्ही एसएससी ऑफिसर भर्ती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि नोकरीचे ठिकाण याविषयी तपशीलवार माहिती जाणून घेऊ.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अर्जामध्ये भरलेली माहिती चुकीची किंवा खोटी असल्याचे आढळल्यास त्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. शिवाय, भारतीय नौदलाने जाहीर केलं आहे की, उमेदवार निवड प्रक्रियेच्य कोणत्याही टप्यावर खोटी माहिती किंवा बनावट कागदपत्रए कागदपत्रे वापरत असलेल्या उमेदवारांचे अर्ज नाकारले जातील.

पदाचे नाव आणि रिक्त जागा:
पदाचे नाव –
एक्सिक्युटीव्ह ब्रॅंच
SSC जनरल सर्व्हिस (GS/X)/हायड्रो कॅडर – 40
एअर ट्रॅफिक कंट्रोलर  – 8
नेव्हल एअर ऑपरेशन्स ऑफिसर – 18
पायलट – 20
लॉजिस्टिक्स – 20

एज्युकेशन ब्रॅंच
एज्युकेशन -18

टेक्निकल ब्रॅंच
इंजिनिअरींग ब्रॉंच (सामान्य सेवा) –30
इलेक्ट्रिकल ब्रॉंच  (सामान्य सेवा) – 50
नेव्हल कन्स्ट्रक्टर – 20

शैक्षणिक पात्रता –
एक्सिक्युटीव्ह ब्रॅंच : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी / MBA / B.Sc / B.Com 60% गुणांसह + फायनान्स  / लॉजिस्टिक / सप्लाय चेन मॅनेजमेंट / मटेरियल मॅनेजमेंट  विषयात डिप्लोमा/  60 टक्के गुणांसह MCA / M.Sc (IT)

एज्युकेशन ब्रॅंच  : 60% गुणांसह संबंधित विषयात M.Sc/ B.E/ B.Tech/ M.Tech

टेक्निकल ब्रॅंच : ६०% गुणांसह संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी.

अर्ज शुल्क – कोणतेही अर्ज शुल्क नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.

ऑनलाइन अर्जाची सुरुवात – 7 ऑक्टोबर 2023

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 29 ऑक्टोबर 2023

अधिकृत वेबसाइट – https://www. indiannavy.nic.in/

अर्ज करण्यासाठी लिंक – https://www.joinIndianavy.gov.in/

जाहिरात –
https://drive.google.com/file/d/1W7GsdQFzQakW213zs9zjDNfns9IzrOaC/view

Tags

follow us