Indian Navy Recruitment 2023: अनेकांना नेव्हीत म्हणजे भारतीय नौदलात नोकरी करायची असते. अनेक जण या भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता 10वी उत्तीर्ण आणि ITI केलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय नौदलात नोकरीची संधी चालून आली आहे. भारतीय नौदल मुख्यालय अंदमान आणि निकोबार कमांड अंतर्गत ट्रेडसमन मेट या पदासाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरती अंतर्गत एकूण 362 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख याबद्दल तपशीलवार नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अर्जामध्ये भरलेली माहिती खोटी किंवा चुकीची आढळल्यास त्या उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. शिवाय, भारतीय नौदलाने जाहीर केले आहे की निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर खोटी माहिती किंवा बनावट कागदपत्रे वापरत असलेल्या उमेदवारांचे अर्ज नाकारले जातील.
पदाचे नाव – ट्रेड्समन मेट.
एकूण रिक्त पदे – 362
शैक्षणिक पात्रता – संबंधित ट्रेडमध्ये ITI किंवा 10वी पास
भाऊसाहेब वाकचौरेंच्या हाती पुन्हा शिवबंधन; ठाकरेंचा शिर्डीचा उमेदवार ठरला?
वय श्रेणी –
खुला प्रवर्ग – 18 ते 25 वर्षे.
ओबीसी – 3 वर्षांची सूट.
मागासवर्गीय – 5 वर्षांची सूट.
अर्ज फी – कोणतेही शुल्क नाही.
नोकरी ठिकाण – अंदमान आणि निकोबार / संपूर्ण भारत.
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाइट – https://www.andaman.gov.in/
जाहिरात :
https://drive.google.com/file/d/1UZdnAY9xNr1wP0gPh2I3PXLZUqD4xQaD/view