Instagram Down : यूजर्सला रिल्स ऐवजी दिसत आहेत कार अन् निसर्गाचं चित्र

रिल्ससाठी जगभरात लोकप्रिय असणारे इन्टाग्राम प्लॅटफॉर्म डाऊन झाल्याचे समोर आले आहे. यामुळे जगभरीतल करोडो इन्टा यूजर्सना अडचणींचा समाना कराव लागत आहे.

Instagram

Instagram

Instagram Down : रिल्ससाठी जगभरात लोकप्रिय असणारे इन्टाग्राम प्लॅटफॉर्म डाऊन झाल्याचे समोर आले आहे. यामुळे जगभरीतल करोडो इन्टा यूजर्सना अडचणींचा समाना कराव लागत असून, अनेकांनी रिल्स ऐवजी स्क्रिनवर कार्स आणि निसर्गाचे चित्र दाखवले जात असल्याचे एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. इन्टा डाऊन झाल्यानंतर एक्सवर #InstagramDown हा हॅशटॅग ट्रेंडिंगला आला आहे. यूजर्सने जरी इन्टा वापरण्यास अडचणी येत असल्याचे म्हटले असले तरी, अद्याप जगातील काही भागात इन्टा डाऊन असल्याच्या वृत्ताचे कंपनीकडून अधिकृत सांगण्यात आलेले नाही.

https://twitter.com/exquisitefarts/status/1806936936314995106

मार्चमध्येही झाले होते डाऊन 

यापूर्वीदेखील मार्चमध्ये जागातील अनेक भागात फेसबुक आणि इन्टाग्राम  डाऊन झाले होते. त्यावेळी जगभरातील करोडो यूजर्सना लॉगिन करण्यास, पोस्टिंग करण्यास तसेच रिल्स पाहण्यास अडचणींचा सामना करावा लागला होता. अमेरिका, युरोप, ब्रिटन आणि आशियातील अनेक भागात इन्ट्रा आणि फेसबुक डाऊन झाल्याच्या तक्रारी यूजर्सने केल्या होत्या.

Exit mobile version