अवघ्या काही वेळातच फेसबुक अन् इन्स्टाग्राम पुन्हा सुरळीत!

Facebook Down

Facebook down : काही तांत्रिक अडचणींमुळे बंद पडलेलं इन्स्टाग्राम आणि फेसबुक अवघ्या काही वेळातच पुन्हा सुरळीत सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे. जगभरातील इस्टाग्राम, (Instagram) फेसबुक (Facebook) अन् थ्रेडचं सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती समोर आली होती. अखेर काही वेळातच तांत्रिक अडचण दूर होऊन फेसबुक आणि इन्स्टाग्राम पुन्हा सुरळीत सुरु झालं आहे. यासंदर्भातील अधिकृत माहिती फेसबुक मेटाचे मालक मार्क झुकरबर्क यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरुन दिली आहे.

नेमकं काय झालं होतं?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इन्टाग्राम युझर्संना आपोआप लॉग आउटचे मेसेज आले होते. संपूर्ण फेसबुक डाउन झाले होते. याबद्दल अद्याप कोणतेही अपडेट आलेली नव्हती. युझर्संना अचानकपणे मोबाईलवर मोबाईलवर सेशन एक्सपायर्ड झाल्याचे संदेश आले होते.

महाराष्ट्राची जनता पवारांचं ओझं वाहतेय, त्यांनी फक्त 5 वर्षांचा हिशोब द्यावा; अमित शाहांची तोफ धडाडली

दरम्यान, फेसबुक आणि इंस्टाग्राम अचानक डाऊन झाल्याने लाखो यूजर्स हैराण झाले होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर #facebookdown ट्रेंडिंग सुरू झाले होते. युजर्स त्यांच्या तक्रारींसोबतच याबाबत मजेशीर प्रतिक्रियाही दिल्याचं समोर आलं होतं.

follow us