काय सांगता? इंस्टाग्राम-व्हॉट्सअप विकले जाणार…फसवणुकीच्या प्रकरणात मार्क झुकेरबर्ग अडकले?

Meta Antitrust Trial Update Instagram WhatsApp : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी असलेल्या मेटाला त्यांचे दोन प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम विकावे लागू शकतात. याचे कारण म्हणजे अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे कंपनीविरुद्ध सुरू असलेल्या अँटीट्रस्ट खटल्याची सुनावणी.
नेमकं प्रकरण काय?
या प्रकरणी मेटाचे दोन सर्वात मोठे प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप आहेत. बाजारातील स्पर्धा संपुष्टात आणण्यासाठी मेटाने व्हॉट्सअप (WhatsApp) आणि इन्स्टाग्राम (Instagram) खरेदी केले, असा आरोप अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशने केलाय. त्यामुळे मेटाच्या अडचणी वाढल्या आहेत. स्वतःची मक्तेदारी निर्माण करण्यासाठी मेटाने (Meta) हे प्लॅटफॉर्म खरेदी केले. 9 डिसेंबर 2020 रोजी, यूएस फेडरल ट्रेड कमिशन आणि 46 राज्यांनी वॉशिंग्टन डीसीच्या जिल्हा न्यायालयामध्ये मेटाच्या विरोधात दोन वेगवेगळे खटले दाखल केले. 2012 मध्ये मेटाने 1 अब्ज डॉलर्समध्ये इंस्टाग्राम विकत घेतले. 2014 मध्ये, मेटाने (Meta) लोकप्रिय मैसेजिंग अॅप ‘व्हॉट्सअॅप’ 19 अब्ज डॉलर्सना विकत घेतले. स्पर्धा कमी करणे, हा यामागे उद्देश होता. मेटाने सोशल मीडिया आणि मेसेजिंग मार्केटला वेठीस धरले. त्यांनी सोशल मीडियावर बेकायदेशीर मक्तेदारी निर्माण केली अन् इतर लहान कंपन्यांना दडपलं, असे आरोप मेटावर करण्यात आलेत. सोशल नेटवर्किंग मार्केटमध्ये मेटाची मक्तेदारी आहे, असं एफटीसी सिद्ध करू शकले नाही. त्यामुळे जून 2021 मध्ये न्यायाधीश जेम्स बोसबर्ग यांनी फेडरल ट्रेड कमिशचा खटला फेटाळून लावला होता.
मेटाविरूद्ध दुसरा खटला 46 राज्यांनी दाखल केला होता. न्यू यॉर्कच्या अॅटर्नी जनरल लेटिया जेम्स यांनी वॉशिंग्टन (Mark Zuckerberg Trapped Case) डीसी, ग्वाम, अलास्का आणि कॅलिफोर्नियासह 46 राज्यांच्या वतीने हा खटला लढवला. त्यांनी देखील मेटाने इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या खरेदीद्वारे बेकायदेशीर मक्तेदारी निर्माण केली असल्याचं म्हटलं. पण न्यायाधिश बोसबर्ग यांनी जून 2021 मध्ये हा खटला फेटाळून लावला होता. त्यांनी म्हटलं की, मेटाने इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप खरेदी करून 8 ते 10 वर्ष उलटून गेली. त्यामुळे कायदेशीर वेळमर्यादा संपली. राज्यांनी हा खटला दाखल करायला उशीर केलाय.
महाझुठी सरकारचे पहिले १०० दिवस कसे होते?, निर्धार शिबीरातून आदित्य ठाकरेंनी पाढाच वाचला
एफटीसीचे मेटावर कोणते आरोप?
– मेटा त्यांच्या स्पर्धक कंपन्यांना खरेदी करते.
– सोशल नेटवर्किंग मार्केटमध्ये मेटाचा मोठा वाटा असल्यामुळे नवीन कंपन्यांना स्पर्धा करणे कठीण झाले.
– मेटाने लहान कंपन्यांना वाढण्यापासून रोखले इतर अॅप्समधील वैशिष्ट्ये कॉपी करून स्नॅपचॅटसारख्या स्पर्धकांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला.
– मेटाने डेटा स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंगचा ताबा घेतला.
– मेटाने जाहिरात बाजारपेठ काबीज केली. स्वतःच्या मर्जीनुसार जाहिरातीचे दर निश्चित केल्यामुळे जाहिरात कंपन्यांना जास्त पैसे मोजावे लागतात.
एफटीसीच्या नेमक्या मागण्या काय?
या खटल्यात एफटीसीच्या 3 मोठ्या मागण्या आहेत. मेटाला इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप कंपन्यांचे विभाजन करण्याचे किंवा विकण्याचे आदेश द्या. एफटीसीच्या मंजुरीशिवाय मेटाला स्पर्धा कमी करणाऱ्या खरेदी करण्यापासून रोखा. लहान कंपन्यांना दडपणारी मेटा रणनीती काढून टाका.
मार्क झुकेरबर्ग काय म्हणतो?
खटल्यावरील स्पष्टीकरणात मार्क झुकेरबर्गने म्हटलंय की, मेटाची उपस्थिती आणखी वाढवण्यासाठी 2012 मध्ये इंस्टाग्राम अन् 2014 मध्ये व्हॉट्सअॅप विकत घेतले. यामुळे दोन्ही अॅप्सची पोहोच आणि वैशिष्ट्ये वाढली. वापरकर्त्यांना अधिक सुविधा मिळाली. मेटाने इंस्टाग्राममध्ये मोठी गुंतवणूक केल्यामुळे ते जागतिक व्यासपीठ बनले. टिकटॉक, यूट्यूब, एक्स, स्नॅपचॅट आणि आयमेसेज सारख्या अॅप्समुळे सध्या सोशल मीडिया मार्केटमध्ये तीव्र स्पर्धा आहे. सोशल मीडिया केवळ मित्र आणि कुटुंबाशी संपर्क साधण्यापुरतं मर्यादित नाही, तर ते मनोरंजन आणि संशोधनाचं भव्य व्यासपीठ बनलंय. त्यामुळे मेटाला अनेक कंपन्यांशी स्पर्धा करावी लागते. मक्तेदारीचा आरोप चुकीचा आहे. मेटा आपल्या वापरकर्त्यांना मोफत अॅप्स प्रदान करत असल्यामुळे जाहिरातींद्वारे वापरकर्त्यांना नवीन उत्पादनांची माहिती मिळते. इन्स्टाग्राम वेगाने वाढत असताना चांगलं काम करण्याचं आव्हान टीमसमोर होतं. केवळ स्पर्धकांना विकत घेणं हे ध्येय नव्हतं. तर वेळेनुसार फेसबुकचं लक्ष बदललं असून डिस्कव्हरी अँड एंटरटेनमेंट’ वर जास्त लक्ष आहे.
आता ‘झूकझूक’ करत धावणाऱ्या रेल्वेत काढता येणार पैसे; महाराष्ट्रातून शुभारंभ
मेटा प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प कनेक्शन काय?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अन् मेटा यांच्यातील वाद नवीन नाही. ट्रम्प यांचा 2020 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत पराभव झाला, त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी कॅपिटल इमारतीवर हल्ला केला. त्यांनी यासंबंधी सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या. नियमांचं उल्लंघन म्हणत फेसबुकने त्यांना फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून बंदी घातली होती, ही बंदी 2023 मध्ये उठवण्यात आली. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात एफटीसीने मेटाविरुद्ध खटला दाखल केला होता. तो अजून मागे घेतलेला नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी मेटाने 8.58 कोटी रुपयांची देणगी दिली होती. तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागारास मेटाच्या संचालक मंडळात समाविष्ट करण्यात आलंय. इतकंच नाही, तर जानेवारीत मेटाने कंटेंट मॉडरेशन धोरण मागे घेतलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून निलंबनाचा न्यायालयात सुरू असलेला खटला मेटाने 214 कोटी रुपये देऊन सेटल केला. वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार माहिती मिळतेय की, मार्क झुकेरबर्गने ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्यांसोबत एफटीसी केस मागे घेण्यासाठी लॉबिंग सुद्धा केलीय.
आपल्यावर काय परिणाम होईल?
FTC आणि Meta प्रकरणातील सुरुवातीचा खटला 27 दिवसांपर्यंत चालू शकतो. निर्णय झाल्यास पुढील वर्षी दंड निश्चित केला जाईल. कोणत्याही पक्षाने निर्णयाविरुद्ध अपील केल्यास निकालासाठी आणखी एक वर्ष लागेल. जर या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांची एन्ट्री झाली तर मेटाची परिस्थिती सुधारू शकते. झुकरबर्ग सध्या इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप विकण्याचा विचार करणार नाही. मेटाने हा खटला हरल्यास इंस्टाग्राम-व्हॉट्सअॅप विकण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तज्ञ म्हणतात की, यामुळे सामान्य माणसाच्या खात्यांना कोणताही धोका नाही. कारण झुकरबर्गविरुद्ध फसवणुकीचा खटला आहे, सोशल मीडिया अकाउंटविरूद्ध नाही.