Download App

ट्विटरचा लोगो बदलण्याची रंजक कहाणी, इलॉन मस्क शब्दाला जागला

नवी दिल्ली : इलॉन मस्क हा ट्विटर यूजर्सला वेळोवेळी धक्के देत आलाय. नुकताच त्याने ट्विटरचा लोगो (Twitter logo) बदलून अनपेक्षित धक्का दिला होता. त्याने हा निर्णय का घेतला याची मोठी सोशल मिडीयावर चर्चा झाली. आता ट्विटरवरच्या निळी चिमणीची जागा डॉजकॉइनने (Dogecoin) घेतली आहे. यावर लोकांनी डॉजकॉइन म्हणजे काय हे शोधले आणि डॉजकॉइनचे (Dogecoin Price Hike) 30 टक्क्यांनी मूल्य वाढले आहे.

2013 मध्ये लाँच झालेल्या या क्रिप्टोकरन्सीला 2021 मध्ये लोकप्रियता मिळाली. त्याचे कारण देखील एलोन मस्क आहे. त्याने डॉजच्या फोटोसह मीम्स शेअर करायला सुरुवात केली आणि नंतर लोकांची त्यात उत्सुकता वाढत गेली.

सोमवारी ट्विटरच्या लोगोवर डॉज दिसून येताच या क्रिप्टोकरन्सीचे मूल्य पुन्हा एकदा वाढले आहे. सोमवारी मस्कच्या निर्णयापूर्वी, डॉजकॉइनचे मूल्य 6.35 रुपये (काल संध्याकाळी 5.30 वाजता) होते, परंतु लोगोमध्ये बदल झाल्यानंतर त्याचे मूल्य 8.45 रुपये (काल संध्याकाळी 7 वाजता) पोहोचले.

करिअर विषयक साहित्य, अभ्यासिका व वेबसाईट विकास योजना

म्हणजेच अवघ्या दीड तासात त्याचे मूल्य 30 टक्क्यांहून अधिक वाढले. यानंतर त्याची किंमत खाली आली पण आता पूर्वीपेक्षा चांगल्या स्थितीत आहे. तरीही Dogecoin ची किंमत आठवड्याच्या सुरूवातीच्या तुलनेत 25 टक्क्यांपेक्षा जास्त मूल्यावर आहे.

ही क्रिप्टोकरन्सी 2013 मध्ये बिली मार्कस आणि जॅक्सन पामर यांनी तयार केली होती. हे बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीची खिल्ली उडवण्यासाठी तयार करण्यात आले होते. त्याच्या लोगोवर Shiba Inu चे चित्र आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, वकिलांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास सूट

मस्कने लोगो का बदलला?
इलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो बदलताना एक ट्विट केले, ‘आश्वासन दिल्याप्रमाणे’. यासोबतच मस्कने एक स्क्रीनशॉटही पोस्ट केला आहे, जो 2022 चा आहे. हा स्क्रीनशॉट मार्च 2022 मध्ये ट्विटर वापरकर्ता आणि मस्क यांच्यातील संभाषणाचा आहे.

यामध्ये मस्क यांनी नव्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची गरज आहे का, असा सवाल केला. याला उत्तर देताना युजरने लिहिले की, फक्त ट्विटर विकत घ्या आणि त्याचा लोगो बर्ड बदलून डॉज वापरा. मस्कनेही तेच केले आणि नंतर वचन पूर्ण करण्यासाठी ट्विट केले.

Tags

follow us