करिअर विषयक साहित्य, अभ्यासिका व वेबसाईट विकास योजना

करिअर विषयक साहित्य, अभ्यासिका व वेबसाईट विकास योजना

LetsUpp | Govt.Schemes

जिल्हा कौशल्य विकास (District Skill Development), रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात (Employment and Entrepreneurship Guidance Centres) येणाऱ्या बेरोजगार उमेदवारांसाठी (Unemployed candidates)करिअर ग्रंथालय सदृश्य अभ्यासिका (Career Library Similar Studies)सुरू करून त्यामध्ये स्पर्धा परीक्षेसाठी (Competitive Examination) उपयुक्त पुस्तके, मासिके, करिअर मार्गदर्शनावरील पुस्तके, वर्तमानपत्रे (Newspapers)उपलब्ध करून मोफत अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध करुन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

योजनेच्या प्रमुख अटी : उमेदवाराने जिल्हयाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी करणे आवश्यक.

फडतूस, काडतूस अन् आता कुचका मेंदू; फडणवीस हे काय बोलून गेले!

आवश्यक कागदपत्र : नोंदणी कार्ड

लाभाचे स्वरूप असे :
✔ ग्रंथालयामधून विविध व्यवसाय मार्गदर्शन साहित्य, स्पर्धा परिक्षांची माहिती देणारी मासिके, पुस्तके, वृत्तपत्रे इ. उपलब्ध करुन दिले जातात.
✔ अभ्यासिकेमध्ये नियमित बसण्याची व्यवस्था उपलब्ध करण्यात येते.
✔ रोजगार व स्वयंरोजगाराच्या नवीन नवीन संधीची माहिती उपलब्ध करुन देण्यात येते.

या ठिकाणी संपर्क साधावा : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रे / विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रे/ आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्रे

(टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube