Investment Tips : तुमची पण सॅलरी येताच संपतेय? मग, 50-30-20 चा फॉर्म्युला वापरा अन् श्रीमंत व्हा!

Investment Tips 50-30-20 मुळे तुम्हाला पैशांचा हिशोब ठेवण्यासाठी कोणत्याही क्लिष्ट एक्सेल शीटची गरज भासत नाही.

Investment Tips : तुमची पण सॅलरी येताच संपतेय? मग, 50-30-20 चा फॉर्म्युला वापरा अन् श्रीमंत व्हा!

Investment Tips : तुमची पण सॅलरी येताच संपतेय? मग, 50-30-20 चा फॉर्म्युला वापरा अन् श्रीमंत व्हा!

What Is 50-30-20 Rule For Investment : महिन्याकाठी तुमच्याही हाती सॅलरी येते पण, महिन्याचा शेवट येईपर्यंत बँक बॅलन्स शून्यावर पोहोचतो. यासाठी आलेला पैसा ‘मॅनेज’ करणे अधिक महत्त्वाचे असून, जगभरातील अर्थतज्ज्ञ श्रीमंत होण्यासाठी 50-30-20 या एका साध्या फॉर्म्युला सांगतात. नेमकं गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला काय? जो तुम्हाला भविष्यात करोडपती बनवू शकतो.

शाळांची ‘दुकानदारी’ बंद! गणवेश, वह्या-पुस्तके आता कोठूनही खरेदी करता येणार; परिपत्रक निघालं

काय आहे 50-30-20 नियम?

हा एक असा आर्थिक मंत्र आहे जो तुमच्या पगाराची विभागणी तीन सोप्या भागांत करतो. यामुळे तुम्हाला पैशांचा हिशोब ठेवण्यासाठी कोणत्याही क्लिष्ट एक्सेल शीटची गरज भासत नाही. What Is 50-30-20 Rule For Investment

1. 50 टक्के रक्कम गरजांसाठी (Needs) : तुमच्या पगाराचा अर्धा हिस्सा हा घरभाडे, किराणा, वीज बिल, प्रवास खर्च आणि वैद्यकीय गरजांसाठी राखून ठेवा. हा तो खर्च आहे ज्याशिवाय तुमचे पान हलत नाही, याला ‘सर्व्हायव्हल खर्च’ असेही म्हणतात.

2. 30 टक्के रक्कम आवडीनिवडींसाठी (Wants) : आयुष्य केवळ बिले भरण्यासाठी नसते. त्यामुळे तुमच्या पगारातील 30 टक्के हिस्सा हा फिरणे, चित्रपट पाहणे, शॉपिंग किंवा बाहेर जेवणासाठी खर्च करू शकता.

3. 20 टक्के रक्कम बचत आणि गुंतवणूक (Savings/Investment) :  पगारातील किमान 20 टक्के रक्कम ही सॅलरी आल्या आल्या बाजूला काढली पाहिजे. ही रक्कम केवळ बँकेत न ठेवता योग्य ठिकाणी गुंतवा.

सगळीकडे नुसती चर्चा! पठ्ठ्या क्यूट पोरीसोबत ‘डेट’वर गेला अन् खिशाला ‘थेट’ होल झाला

गुंतवणुकीतून कशी होईल संपत्तीची निर्मिती?

हा नियम केवळ बचत करायला शिकवत नाही, तर ‘कंपाउंडिंग’ची ताकद समजून सांगतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा पगार 10 हजार असेल, तर नियमानुसार त्याने किमान 2 हजारांची गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. जर तुम्ही दरमहा 2 हजार रुपयांची SIP सुरू केली आणि त्यावर वार्षिक सरासरी 12% परतावा मिळाला, तर 10 वर्षांत तुमचा फंड सुमारे 4.6 लाख रुपये होईल. हीच गुंतवणूक सातत्याने 20 वर्षे चालू ठेवली, तर तुमच्याकडे 20 लाख रुपयांपेक्षा जास्त निधी जमा होऊ शकतो.

UPI : आता बँक खात्याशिवाय चालणार UPI; कसं सेट करायचं? कुणाकडे असणार पेमेंट अप्रुव्हल

अंमलबजावणी कशी करावी?

तज्ज्ञांच्या मते, पगार हातात येताच सर्वात आधी 20 टक्के रक्कम गुंतवणुकीसाठी (SIP, म्युच्युअल फंड किंवा इमर्जन्सी फंड) वेगळी करावी. त्यानंतर उरलेल्या पैशांचे नियोजन करावे. आधी खर्च आणि मग उरलेली बचत करण्याऐवजी आधी गुंतवणूक आणि मग खर्च हे सूत्र अवलंबल्यास तुम्ही कमी वयात आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकता.

डिस्क्लेमर: ही माहिती केवळ माहितीसाठी दिलेली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

Exit mobile version