Download App

Share Market : चार दिवसांत गुंतवणूकदारांनी 7 लाख कोटी रुपये गमावले

  • Written By: Last Updated:

मुंबई : भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा विक्रीचा टप्पा आला आहे. आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी, BSE सेन्सेक्स 1.53% किंवा 928 अंकांनी घसरून 59,745 वर बंद झाला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 59,681 अंकांपर्यंत घसरला. त्याच वेळी, NSE निफ्टी 272.40 अंकांनी घसरून 17,554 अंकांवर स्थिरावला. गेल्या चार दिवसांपासून बाजारावर दबाव आहे. गेल्या 4 व्यापार सत्रांमध्ये सेन्सेक्स 1,500 हून अधिक अंकांनी घसरला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे सात लाख कोटी रुपये बुडाले आहेत.

बुधवारी बाजार भांडवलात 3.9 लाख कोटी रुपयांचा तोटा झाला. खरं तर, BSE वरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार मूल्य 261.3 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. 16 फेब्रुवारी रोजी बाजार भांडवल 268 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होते.

शेअर बाजारातील विक्रीची अनेक कारणे आहेत. यातील सर्वात मोठे कारण अमेरिकेच्या सेंट्रल बँक फेड रिझर्व्हशी संबंधित आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी फेड रिझर्व्ह पुन्हा एकदा व्याजदर वाढवू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. असे झाले तर मंदीचे वातावरण अधिक गडद होईल.

IND W vs AUS W T20 : भारतासाठी आज ‘करो या मरो’ सामना

या भीतीमुळे मंगळवारी अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मंगळवार हा यूएस मार्केटसाठी 2023 चा सर्वात वाईट दिवस होता. S&P 500 जवळपास 2% घसरला, तर Dow Jones Industrial Average 697 पॉइंट्स किंवा 2.1% घसरला. त्याच वेळी, नॅस्डॅक कंपोझिट 2.5% बुडाला.

Indian Amry कडून अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठा बदल

जागतिक स्तरावर तणावाचाही बाजारावर परिणाम झाला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ऐतिहासिक अण्वस्त्र नियंत्रण करार स्थगित केल्यानंतर अमेरिका आणि रशिया यांच्यात तणाव वाढला आहे. विदेशी गुंतवणुकदारांची विक्री या वर्षी तीव्र झाली आहे. कॅलेंडर वर्ष 2022 मध्ये परकीय गुंतवणूकदारांनी आतापर्यंत 31,000 कोटी रुपयांची विक्री केली आहे.

Tags

follow us