Download App

iPhone 15 सीरीज आज होणार लाँच, भारतात किंमत किती असेल?

Apple iPhone 15 Series : Apple ने आज आपला मेगा इव्हेंट (Apple Event Wonderlust 2023) आयोजित केला आहे. हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार आज रात्री 10:30 वाजता लाइव्ह केला जाणार आहे. अॅपलचा हा कार्यक्रम कॅलिफोर्नियातील अॅपल पार्कमध्ये होणार आहे. Apple या इव्हेंटमध्ये नवीन iPhone सीरीज (Apple iPhone 15 Series) लॉन्च करू शकतो. Apple च्या आगामी सिरिजमध्ये iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max यांचा समावेश आहे.

नवीन आयफोन सीरीज व्यतिरिक्त, Apple आज आपल्या मेगा इव्हेंटमध्ये इतर अनेक प्रोडक्ट लॉन्च करू शकतो. आयफोन 15 सीरीज व्यतिरिक्त या इव्हेंटमध्ये Apple Watch Ultra 2 संदर्भात काही नवीन घोषणा होऊ शकतात. नवीन आयफोन सीरीज (Apple iPhone 15 Series) सोबत Apple Watch Series 9 आणि सेकंड जनरेशन वॉच अल्ट्रा मॉडेल देखील आणले जाऊ शकतात.

IND vs SL Asia Cup : लंकेच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाजांचे लोटांगण, अवघ्या 213 धावांपर्यंत मजल

Apple Watch Ultra 2 मध्ये प्रोसेसर संदर्भात नवीन बदल होऊ शकतो. Apple Watch Ultra 2 कंपनी S9 चिपसेटसोबत आणू शकते. यावेळी, ऍपल वॉच अल्ट्रा 2 च्या कामगिरीमध्ये सुधारणा दिसून येते. याशिवाय iOS 17, सेकंड जनरेशन AirPods Pro आणि Truly Wireless Stereo (TWS) लॉन्च केला जाऊ शकतो.

याआधी, आयफोनची विक्री जागतिक लॉन्चनंतर भारतात सुरू झाली होती. ब्लूमबर्गने आपल्या अहवालात म्हटले आहे की, आयफोन 15 ची असेंब्ली भारतात होत आहे आणि आयफोन 15 सीरीजच्या जागतिक लॉन्चनंतर लगेचच भारतात आयफोन 15 ची विक्री सुरू होईल.

Libya Flood : लिबियात पावसाचा हाहाकार ! धरणे फुटली, इमारती वाहिल्या; दोन हजारांहून अधिक जणांचा मृत्यू

आयफोन 15, आयफोन 15 प्रो, आयफोन 15 प्लस आणि आयफोन प्रो मॅक्स भारतात लॉन्च होताना उपलब्ध होतील की नाही हे स्पष्ट नाही. कारण प्रो व्हेरिएंट भारतात थोड्या उशिराने लॉन्च झाले आहेत आणि या मॉडेल्सची असेंब्ली देखील भारतात केली जात नाही.

Tags

follow us